मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेजिटेबल मनचाऊ सूप

Photo of Vegetable Manchow  Soup by Jyothi Rajesh at BetterButter
12630
474
4.6(0)
0

व्हेजिटेबल मनचाऊ सूप

Jan-22-2016
Jyothi Rajesh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • चायनीज
  • सूप
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 गाजर
  2. 10 हिरव्या फरसबी
  3. 25 ग्रॅम्स (1/4 वाटी) कोबी
  4. 25 ग्रॅम्स (1/4 वाटी) पांढऱ्या कांद्याची पात
  5. 1 मोठा चमचा आले
  6. 1 मोठा चमचा लसूण
  7. 1 मोठा चमचा डार्क सोया सॉस
  8. 1 लहान चमचा व्हिनेगर
  9. मीठ स्वादानुसार
  10. 1 मोठा चमचा मिरपूड
  11. 1 मोठा चमचा तिळाचे तेल
  12. 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोर
  13. 1/4 कप पाणी + अतिरिक्त
  14. सजविण्यासाठी हिरवी कांद्याची पात
  15. अर्धी वाटी तळलेले नुडल्स

सूचना

  1. सर्व भाज्या धुवा (आले, लसूण, गाजर, फरसबी, कोबी) आणि कांद्यासह अतिशय बारीक चिरा.
  2. एका कढईत तेल गरम करा. गरम तेलात आले, लसूण आणि कांदा घाला. कांदा गुलाबी होईपर्यंत तळा.
  3. नंतर त्यात बारीक चिरलेल्या भाज्या, मीठ आणि मिरपूड घाला. 3 ते 4 मिनिटे मोठ्या आचेवर शिजवा.
  4. नंतर सोया सॉस आणि विनेगर घाला. एकजीव होईपर्यंत मिसळा. आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि एक उकळी येऊ द्या.
  5. कॉर्नफ्लोर पाण्यात घाला आणि गाठी होणार नाहीत अशा प्रकारे मिसळून घ्या. एकसारखे हलवीत ते मिश्रण सूपमध्ये ओता. आणखीन 3 ते 5 मिनिटे हळू हळू उकळवा आणि शिजवा.
  6. पॅकेटवर दिलेल्या निर्देशानुसार नुडल्स पाण्यात शिजवा आणि गाळून घ्या. गरम तेलात नुडल्स कुरकुरीत होईपर्यंत तळा. तेलातून काढून घ्या आणि अतिरिक्त तेल काढण्यासाठी एका पेपर टॉवेलवर ठेवा.
  7. सूप तयार झाले की स्वादानुसार मसाले घाला आणि गॅस बंद करा.
  8. वाढण्याच्या वाडग्यात सूप ओता, त्यावर तळलेले नुडल्स आणि हिरव्या कांद्याची पात घालून त्वरित वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर