Photo of Dinkache ladu by Pratiksha More at BetterButter
977
7
0.0(1)
0

Dinkache ladu

Dec-10-2017
Pratiksha More
120 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. खारीक पावडर पाऊण किलो
  2. खोबरे पाव किलो
  3. तूप ३०० ग्राम
  4. गूळ ३०० ग्राम
  5. डिंक १५० ग्राम
  6. खसखस ५० ग्राम
  7. बदाम ५० ग्राम
  8. अक्रोड ५० ग्राम
  9. मेथी पावडर २० ग्राम
  10. हलिव १०० ग्राम
  11. जायफळ अर्ध
  12. वेलदोडे ४/५

सूचना

  1. खोबरे किसून घ्यावे. वेलदोडे सोलून पावडर करून घ्यावे. गूळ बारीक चिरावा. कढई तापवून त्यात हलिव भाजून घेऊन मिक्सरला पावडर करून घावे.
  2. कढईत खोबरे भाजून घ्यावे. नंतर खसखस गुलाबी रंगावर भाजून घ्यावी. कढईत तूप घालून त्यात डिंक थोडा थोडा घालून चांगला तळून घ्यावा. तो गार झाल्यावर हाताने चुरला गेला म्हणजे चांगला तळला असे समजावे. बदाम अक्रोड थोडे तळून मिक्सरला पावडर करून घ्यावे. खारीक पावडर आणि मेथी पावडर थोडी तुपात भाजून घ्यावी.
  3. कढईत १ चमचा तूप गरम करून त्यात बारीक केलेला गूळ घालून पातळ करून घ्यावे. आता सर्व साहित्य एकत्र करावे त्यात वेलदोडे पावडर करून आणि जायफळ किसून घालावे.
  4. दोन्ही हाताला तूप लावून लाडू वळावेत.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Yummyy...

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर