Tricoloured Idli | Tricoloured Idli Recipe in Marathi

प्रेषक Ujwala Nirmale  |  11th Dec 2017  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Tricoloured Idli by Ujwala Nirmale at BetterButter
Tricoloured Idliby Ujwala Nirmale
 • तयारी साठी वेळ

  4

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

4

1

Tricoloured Idli

Tricoloured Idli बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tricoloured Idli Recipe in Marathi )

 • 3 छोटे बाऊल इडलीचे बँटर
 • 4 छोटी गाजर
 • 1 बाऊल पालकची पाने
 • मीठ चवीनुसार
 • इडली बँटरसाठी 2 वाट्या तांदूळ किंवा तयार इडली रवा
 • 1 वाटी उडीद डाळ
 • तेल गरजेनुसार
 • पाणी आवश्यकतेनुसार

Tricoloured Idli | How to make Tricoloured Idli Recipe in Marathi

 1. तांदूळ / इडली रवा व डाळ रात्री वेगळे भिजत घालणे; सकाळी वाटून एकत्र करून ठेवणे. रवा वापरल्यास डाळ वाटून मिक्स करणे.
 2. लगेच इडली करायची असेल तर 1 च. लिंबूफुल व 1 च. खाण्याचा सोडा घालून झटपट छान स्पंजी इडल्याही होतात. नाहीतर बँटर चार तास भिजवत ठेवणे छान फुगून वर येते.
 3. गाजराची प्युरी करुन घ्या. पालकची प्युरी करून घ्या. तीन वेगवेगळे बाऊल घेवून त्यात समप्रमाणात बँटर ओता. एक बाऊल पांढरा रंग; दूसऱ्या बाऊलमध्ये गाजराची प्युरी मिक्स करणे,तिसऱ्या बाऊलमध्ये पालकची प्युरी मिसळणे. मीठ चवीनुसार घालून मिक्स करावे इडलीसाठी बँटर तयार
 4. इडली पात्र घेऊन त्यात एक थर नारंगी म्हणजे गाजर प्युरी वाला देणे. दुसरा पांढरा थर देणे . तिसरा पालकच्या बँटरचा म्हणजे हिरवा रंगाचा देणे. 10 मिनिटं इडली पात्रात वाफवणे. तिरंगी इडली तयार अशा सर्व इडल्या करून घेणे खोबऱ्याच्या चटणी व सांबार सोबत सर्व्ह करावे

My Tip:

तिरंगी इडली साठी गाजर व पालक वापरल्यामुळे इडली आर्कषक दिसते व कोणतही कृत्रिम रंग वापरावे लागत नाहीत

Reviews for Tricoloured Idli Recipe in Marathi (1)

Aarati Patil2 years ago

Reply