मुख्यपृष्ठ / पाककृती / इडली सांबार चटणी

Photo of IDLI sambar chutney by Chayya Bari at BetterButter
1335
8
0.0(0)
0

इडली सांबार चटणी

Dec-11-2017
Chayya Bari
480 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडली सांबार चटणी कृती बद्दल

आंबवलेले पदार्थ पौष्टीक व आवश्यक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो कॅलरी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदूळ व उडीद डाळ 2:1 या प्रमाणात घेऊन गिरणीतून रवा काढून आणला
  2. इडली रवा 4 वाट्या
  3. थोडे ताक
  4. मीठ
  5. तूर डाळ व मूग डाळ 1 वाटी
  6. हळद,मीठ ,चिंच, गूळ चवीप्रमाणे
  7. वांगी भोपळा कोणतीही भाजी सांबारसाठी
  8. सांबार मसाला 2 चमचे
  9. तेल फोडणीसाठी
  10. हिंग कढीपत्ता
  11. चटणी साठी साहित्य
  12. ओले खोबरे छोटी वाटी
  13. लसूण हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
  14. मीठ
  15. साखर
  16. लिंबाचा रस 2 चमचे
  17. जिरे मोहरी कढीपत्ता फोडणीसाठी

सूचना

  1. इडली रवा रात्री ताक व कोमट पाणी घालून भिजवले
  2. जास्त सरसरीत नको आयत्या वेळी पाणी घालता येते
  3. सकाळी मीठ घातले
  4. इडली पात्राला तेल लावून इडल्या घातल्या
  5. इडली कुकर मध्ये २० मिनिटे वाफवली
  6. सूरी टोचून चेक केले
  7. इडली तयार
  8. चटणीसाठी ओले खोबरे मिक्सरवर बारीक केले
  9. तेल तापवून जिरं मोहरी कढीपत्ता टाकून फोडणी केली
  10. मगत्यात मिरची लसूण पेस्ट टाकून परतले
  11. हि फोडणी खोबऱ्याचा मिश्रणावर ओतली
  12. साखर व लिंबाचा रस घालून मिक्स केले
  13. सांबारसाठी दाली कूकर मध्ये मऊ शिजवून घेतल्या
  14. तेल तापवूनजिरे मोहरी हिंग कढीपत्ता घालून फोडणी केली
  15. मग आले लसूण पेस्ट टाकली
  16. मग भाज्या टाकून वाफ घेतली
  17. मग हळद मीठ सांबार मसाला चिंच गूळ घातला
  18. भाज्या चांगल्या शिजल्यावर घोटून डाळी घातले
  19. गरजेप्रमाणे पाणी घातले
  20. उकळी आल्यावर कोथिंबीर घातली
  21. फोटो प्रमाणे इडली सर्व्ह केली
  22. इडली नाश्ता तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर