कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / दोडक्याच्या ठेचा

Photo of Dodakyacha thecha by Trupti Raut at BetterButter
0
9
0(0)
0

दोडक्याच्या ठेचा

Dec-11-2017
Trupti Raut
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोडक्याच्या ठेचा कृती बद्दल

दोडक्याच्या ठेचा दोडक्याची सुक्की भाजी पण म्हणू शकतो आपण . पावकिलो दोडके 4/5हिरव्या मिरच्या 7/8लसूण पाकळ्या कोथिंबीर,जिरे,मोहरी,कढीपत्ता मीठ,तेल,हिंग ,हळद जरआवडत असेल तर त्यात हरबरा डाळ भिजवून टाका .मलाआवडते म्हणून मी टाकली आहे. दोडकेशिरा काढून किसून घ्यायचे .लसूण मिरची कोथिंबीर ची पेस्ट करायची .तेल गरम करून मोहरी जिरे कढीपत्ता हिंग टाका मग मिरची लसूण पेस्ट हळद टाकून परतायचे व त्यात किसलेला दोडका व भिजवलेली डाळ टाकून मीठ टाकायचे आणि मस्त परतून ते बारीक गॅस वर झाकण ठेऊन शिजवून घ्यायचे .गरमा गरम भाकरी बरोबर सर्व्ह करा .

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोडके पाव किलो
  2. हिरव्या मिरच्या4/5
  3. लसूण 7/8 पाकळ्या
  4. मोहरी
  5. कोथिंबीर
  6. जिरे
  7. कढीपत्ता
  8. मीठ
  9. हळद
  10. भिजवलेली चणा डाळ
  11. तेल

सूचना

  1. दोडके साल काढून किसून घ्या .
  2. नंतर तेल गरम करून मोहरी जिरे हिंग कढीपत्ता फोडणी करा.
  3. मग त्यात मिरची लसूण पेस्ट हळद मीठ टाका.
  4. मग त्यात दोडका आणि भिजवलेली चणा डाळ टाकून झाकण ठेऊन शिजवून घ्या .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर