मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबीर वडी

Photo of KOTHIMBIR vadi by Chayya Bari at BetterButter
796
9
0.0(0)
0

कोथिंबीर वडी

Dec-12-2017
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबीर वडी कृती बद्दल

जिभेची लाड पुरविणारी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कोथिंबीर धुवून चिरलेली 4 वाट्या
  2. तांदुळाचे पीठ 3/4वाटी
  3. बेसन 1/2वाटी
  4. ज्वारीचे किंवा बाजरीचे पीठ 1 वाटी
  5. कॉर्नफ्लोअर 2 चमचे(ऐच्छिक)
  6. मीठ, हळद चवीनुसार
  7. हिरवी मिरची लसूण पेस्ट आवडीप्रमाणे
  8. हिंग 1/4चमचा
  9. ओवा 1/2चमचा
  10. तीळ२चमचे जास्त असेल तर छान दिसतात
  11. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम कोथिंबीर धुऊन चिरून घ्यावी
  2. त्यात दिलेली पीठे मिक्स करावी
  3. मीठ हळद हिंग घालून मिक्स करावे
  4. हिरवी मिरची लसूण पेस्ट घालून चांगले मिक्स करावे
  5. गरजेप्रमाणे अगदी थोडे थोडे पाणी घालून मिक्स करून घट्ट गोळा करावा
  6. मग त्याचे रोल करावे
  7. चाळणीला तेल लावून त्यात रोल ठेवावे
  8. पातेेल्यात पाणी ठेवून त्यात स्टॅन्ड ठेवून त्यावर चाळणी ठेवावी
  9. 20 मिनिटे वड्या वाफवून घ्याव्या
  10. थंड झाल्या की कापून तळाव्या
  11. तळताना कडकडीत तेलात सोडाव्या व परतावल्या कि मंद गॅस करावा कुरकुरीत होतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर