मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकुरीत चकली

Photo of KURKURIT chakli by Chayya Bari at BetterButter
1378
8
0.0(0)
0

कुरकुरीत चकली

Dec-13-2017
Chayya Bari
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरकुरीत चकली कृती बद्दल

फक्त तांदूळ व उडीद डाळ वापरून केलेली चकली

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदूळ व उडीद डाळ 2:1 प्रमाणात भाजून दळलेले भाजणीचे पीठ 3 वाट्या
  2. तिखट,मीठ,हळद चवीप्रमाणे
  3. ओवा 1 छोटा चमचा
  4. तीळ 2 मोठे चमचे
  5. धने व जिरे पावडर प्रत्येकी 1/2चमचा
  6. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम दीड वाटी पाणी तापत ठेवले
  2. त्याला उकळी आल्यावर त्यात तिखट मीठ हळद तीळ ओवा धने जिरे पावडर व 1 चमचा तेल घातले
  3. मग उकळत्या पाण्यात भाजणीचे पीठ टाकून नीट हलविले
  4. गॅस बंद केला
  5. अर्धा तास पीठ झाकून ठेवले
  6. मग परातीत पीठ घेऊन कोमट पाण्याने मळून घ्यावे
  7. मग चकल्या पाडून तळून घ्याव्या
  8. कडकडीत तेलात चकली सोडून जारावेळाने पलटी करावी
  9. 3 मिनिटाने गॅस मंद करून कुरकुरीत तळावी
  10. हा गरम चकलीचा नाश्ता बघता बघता फस्त होतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर