लो कार्ब, ग्लुटन फ्री कॉलिफ्लॉवर ब्रेड स्टिक्स | Low Carb, Gluten Free Cauliflower Bread Sticks Recipe in Marathi

प्रेषक Priya Suresh  |  25th Jan 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Low Carb, Gluten Free Cauliflower Bread Sticks recipe in Marathi,लो कार्ब, ग्लुटन फ्री कॉलिफ्लॉवर ब्रेड स्टिक्स, Priya Suresh
लो कार्ब, ग्लुटन फ्री कॉलिफ्लॉवर ब्रेड स्टिक्सby Priya Suresh
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

546

0

लो कार्ब, ग्लुटन फ्री कॉलिफ्लॉवर ब्रेड स्टिक्स recipe

लो कार्ब, ग्लुटन फ्री कॉलिफ्लॉवर ब्रेड स्टिक्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Low Carb, Gluten Free Cauliflower Bread Sticks Recipe in Marathi )

 • 3 वाट्या अगदी बारीक चिरलेला कॉलिफ्लॉवर
 • 2 फेटलेली अंडी
 • मीठ
 • 3 नग बारीक वाटलेल्या लसणाच्या पाकळ्या
 • अर्धी वाटी किसलेले मोझरेला चीज
 • अर्धी वाटी किसलेले इम्मेंटल चीज
 • 1/2 लहान चमचा ओरेगानोची पाने

लो कार्ब, ग्लुटन फ्री कॉलिफ्लॉवर ब्रेड स्टिक्स | How to make Low Carb, Gluten Free Cauliflower Bread Sticks Recipe in Marathi

 1. ओव्हनला 400 फॅरनहाइटवर प्रीहीट करा. एक बेकिंग शीट बेकिंग ट्रेमध्ये घाला. एका वाडग्यात बारीक चिरलेला फ्लॉवर, अंडी, वाटलेला लसूण, किसलेले मोझरेला चीज आणि मीठ घ्या.
 2. सर्व नीट मिसळा. तयार झालेल्या मिश्रणाचे दोन भाग करा. प्रीहीट केलेल्या बेकिंग ट्रेमध्ये ठेवा.
 3. प्रत्येक भाग लंबगोल आकाराचे डिस्क बनवा आणि 15-20 मिनिटे किंवा बदामी रंगाचे होईपर्यंत बेक करा.
 4. आता बेकिंग ट्रे काढा आणि त्यावर इम्मेन्टल चीज, सुकलेले ओरगानोची पाने पृष्ठ भागावर घाला आणि पुन्हा 5-10 मिनिटे किंवा चीज वितळेपर्यंत भाजा. ओव्हन बंद करा आणि बेकिंग ट्रे बाहेर काढा.
 5. थोडे थंड होऊ द्या आणि नंतर ब्रेड स्टीकसारखे काप करा. कोमट किंवा सामान्य तापमानावर तुमच्या आवडत्या सॉसबरोबर वाढा.

Reviews for Low Carb, Gluten Free Cauliflower Bread Sticks Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo