मुख्यपृष्ठ / पाककृती / शिळी भाकरी आणि ठेचा

Photo of Shili bhakari aani Thecha by pranali deshmukh at BetterButter
1287
9
0.0(0)
0

शिळी भाकरी आणि ठेचा

Dec-14-2017
pranali deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिळी भाकरी आणि ठेचा कृती बद्दल

न्याहारी म्हणजे पूर्वी रात्रीची भाकरी त्याच्यावर तेल तिखट मीठ घेऊन शेतकरी शेतात जायचा .महाराष्ट्रात अजुनहि सकाळची न्याहारी म्हणजे रात्रीची उरलेली भाकरी असा ठरलेला बेत असतो शिवाय ...भरपूर स्टॅमिना मिळतो ...लो फॅट ...लो कॅलरीज ...इतिहास साक्षी आहे भाकरीचा मोह कोणालाच टाळता येत नाही ....समोर पंच पक्वानांचं ताट जरी असलं तरी मन भाकरीतच गुंतत ..... निदान आता खाता नाही आली तर रात्रीला खाईल शिळी पण जास्त रुचकर लागते ,असं मनाला आपण समजावून सांगतो ....तिच्या सोबतीला ठेचा असेल तर ....! दुधात साखरच .मग आणखी काय पाहिजे .... ती दिसायला सर्वसाधारण असली तरी आकर्षक आहे ....एकदा पाहून मन भरत नाही .....आणि कधीच बोर होत नाही .ती रसनेला आवडतेच पण त्याहीपेक्षा मनालाही तृप्त करते . भाजीवाल्याकडे रोजच अंबाडीच्या भाजीवर नजर जाते आज नको उदयाला घेऊ असं करत आज घेऊनच टाकली .आपलं बायकांचं असं असतं ....सेलमध्ये आवडलेली साडी जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत रोज ती कशी छान आणि डिस्काउंट मुळे कमी रेटची आहे हे आपण स्वतःलाच पटवून देत असतो , आणि नवीन बघितलेली रेसिपी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत काही चैन पडत नाही .तसच काहीसं अंबाडीच्या बाबतीत झालं ....आज उद्या करता करता घेतली एकदाची ....

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 2

  1. ज्वारीचं पीठ एक वाटी
  2. अंबाडी
  3. मीठ
  4. हिरवी मिरची
  5. लसूण पाकळ्या
  6. जिरे
  7. तेल

सूचना

  1. अंबाडीचे पान तोडून स्वछ धुऊन घ्या ..
  2. कूकरमधे हि पण पुरेसा पाणी घालून शिजवून घ्या .
  3. थंड झाल्यावर रवीने आहटुन त्यामध्ये पचेल इतके पीठ घाला ,
  4. चवीसाठी मीठ ,आणि छान मिक्स करून गोळा बनवा .
  5. गोळा थोडं घोळणं घेऊन लाटून तव्यावर नेहमीच्या भाकरीसारखे एका बाजूला पाण्याचा हात लावून भाजून घ्या .
  6. हिरवी मिरची थोडं तेल टाकून भाजून घेऊन
  7. त्यामध्ये मीठ +जिरं +लसूण पाकळ्या +कोथिंबीर +थोडं लिंबाचा रस एकत्र करून वाटून घ्या .
  8. ठेचा जाडसर ठेवा .आणि वरून तेलाची धार टाकून ....जीवनाचा आनंद घ्या ...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर