मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक ढोकळा तिखट ढोकळा

Photo of Poshtik Dhokala tikhat Dhokala by pranali deshmukh at BetterButter
790
8
0.0(0)
0

पौष्टिक ढोकळा तिखट ढोकळा

Dec-14-2017
pranali deshmukh
720 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक ढोकळा तिखट ढोकळा कृती बद्दल

सकाळची न्याहारी ....एकदम भारी .....त्याला बघूनच खुश होते स्वारी .....सकाळची न्याहारी जर का पौष्टिक टेस्टी ....यमी ....आणि ........आणि पोटभरू पाहिजे असेल तर ढोकळा खूप छान ऑप्शन आहे ....एक म्हणजे हा मल्टिग्रेन आहे . दुसरी गोष्ट म्हणजे बनवायला अगदी सोपा आहे . दात असो किंवा नसो प्रत्येकाला सोयीचा ....शिवाय छोटीमोठी पिकनिक असेल तर कोरडा पदार्थ असल्यामुळे कॅरी करायला फार सोईचं होत....

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. चार वाटी तांदूळ
  2. एक वाटी चणा डाळ
  3. एक वाटी उडीद डाळ +
  4. तूर डाळ +
  5. मूग डाळ
  6. हळद
  7. लाल मिरची
  8. कढीपत्ता
  9. मोहरी
  10. हिंग
  11. खाण्याचा सोडा किंवा इनो प्लेन
  12. मीठ
  13. तेल
  14. खोबरं
  15. दही
  16. साखर
  17. कोथिंबीर

सूचना

  1. तांदूळ आणि डाळी ,सहा ते सात तास भिजत घाला .
  2. पाणी निथळून ,धुवून ,मिक्सरमधून वाटून घ्या .
  3. दोन्ही मिश्रण एकत्र करा .छान मिक्स करून
  4. फर्मनटेशनसाठी परत. पाच सहा तास झाकून ठेवा .
  5. बॅटर फुलून येईल .त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला .
  6. किंचित हळद घालून एकजीव करा .
  7. दोन टी स्पून गरम तेल घाला .सोडा किंवा इनो घालून मिक्स करा .
  8. एका खोल ताटलीत तेल लावून बॅटर टाका .आणि वाफवायला ठेवा .
  9. वीस मिनिट स्टीमिंग झाल्यावर काहीवेळानी एका सुरीने चौकोनी काप पाडा.
  10. काढइत तेल गरम करा .
  11. मोहरी घाला कढीपत्ता ,लाल मिरची ,घालून कापलेले ढोकळे छान परतून घ्या .
  12. खोबरं चटणी
  13. ओलं नारळ ,दही ,साखर ,हिरवी मिरची ,मीठ ,कोथिंबीर ,मिक्सरमधून वाटून घ्या .
  14. हा ढोकळा नेहमींपेक्षा तिखट लागतो ...
  15. आंबट गोड चटणीबरोबर एकदम टेस्टी लागतो .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर