मुख्यपृष्ठ / पाककृती / मोड आलेल्या मुगाची जाळीदार धिरडे

Photo of Sprouts mong net chilla by Rohini Rathi at BetterButter
688
11
0.0(0)
0

मोड आलेल्या मुगाची जाळीदार धिरडे

Dec-14-2017
Rohini Rathi
480 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोड आलेल्या मुगाची जाळीदार धिरडे कृती बद्दल

मुगाचे धिरडे खाण्यास अतिशय चवदार व पौष्टिक आहेत जाळीदार पद्धतीने बनवलेली ही धिरडे लहान मुले आनंदाने खातात

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दोन वाटी मोड आलेले मूग
  2. चिरलेला पालक एक कप
  3. आलं-लसणाची पेस्ट दोन टेबल स्पून
  4. हिरव्या मिरचीची पेस्ट एक टेबल स्पून
  5. बेसन पीठ दोन टेबल स्पून
  6. मीठ चवीनुसार
  7. सारणासाठी
  8. बारीक चिरलेली कोबी अर्धा कप
  9. बारिक किसलेले खोबरे अर्धा कप
  10. बारीक चिरलेली शिमला मिरची 1
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल एक चमचा
  13. मोहरी एक छोटा चमचा
  14. डाळिंबाचे दाणे सजवण्यासाठी
  15. तेल धिरडे भाजण्यासाठी

सूचना

  1. प्रथम पालकाची पाने चिरुन स्वच्छ धुऊन घ्या
  2. पालकाची प्युरी बनवून घ्या
  3. मोड आलेल्या मुग मिक्सरमधून वाटून घ्या
  4. मूग आणि पालकाची प्युरी एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ आलं-लसणाची पेस्ट हिरवी मिरचीची पेस्ट दोन चमचे बेसनाचे पीठ घालून धिरड्याचे बेटर बनवा
  5. एक नॉन स्टिक पॅन घेऊन तापवून घ्या
  6. टोमॅटो केचप च्या बाटलीत वरील धिरड्या चे मिश्रण भरून घ्या
  7. बाटलीच्या साह्याने जाळीदार मुगाचे धिरडे बनवून घ्या
  8. अशा प्रकारे पूर्ण जाळीदार धिरडे बनवा
  9. धिरडे ला अलगत उलटे करून दुसरी बाजू भाजून घ्यावी
  10. धिरडे तयार आहे
  11. सारणासाठी
  12. तेल गरम करून मोहरी ची फोडणी द्या
  13. त्यात चिरलेली कोबी शिमला मिर्च किसलेले खोबरे मीठ घालून परतून घ्यावे
  14. तयार सारण धिरड्याच्या मध्यभागी ठेवून रोल करून घ्यावा
  15. अशाप्रकारे तयार हिऱ्याला सजवण्यासाठी डाळिंबाचे दाणे जाळीच्या भागातलावावी
  16. अशाप्रकारे तयार झाले मुगाची जाळीदार धिरडे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर