मुख्यपृष्ठ / पाककृती / सुरळीच्या वड्या

Photo of Surali chi vadi by Rohini Rathi at BetterButter
1291
9
0.0(0)
0

सुरळीच्या वड्या

Dec-15-2017
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुरळीच्या वड्या कृती बद्दल

सुरळीच्या वड्या खाण्यास चवदार आणि लज्जतदार आहे गुजरात मध्ये सुरळीच्या वड्या ना खाडवी म्हणतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. एक कप बेसन पीठ
  2. एक कप आंबट ताक
  3. दोन कप पाणी
  4. एक लहान चमचा हळद
  5. चिमुटभर हिंग
  6. तेल एक चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. फोडणीसाठी
  9. तेल एक चमचा
  10. मोहरी एक छोटा चमचा
  11. बारीक चिरलेली हिरवी मिरची एक
  12. तीळ एक लहान चमचा
  13. कढीपत्त्याची पाने चार-पाच
  14. बारीक चिरलेली कोथंबीर
  15. किसलेले खोबरे
  16. सजवण्यासाठी डाळिंबाचे दाणे

सूचना

  1. बेसन, ताक, पाणी एकत्र करावे
  2. पीठाच्या गुठळ्या होऊ देऊ नयेत. हळद आणि हिंग घालावे. चवीपुरते मीठ घालावे.
  3. कढईत सर्व मिश्रण घालावे. मध्यम आचेवर मिश्रण शिजेपर्यंत न थांबता ढवळत राहावे. नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते.
  4. सुरळीच्या वड्या साठी मिश्रण तयार आहे हे तपासण्यासाठी ताटाच्या मागील बाजूला थोडेसे मिश्रण लावून बघावे की वडी होते की नाही जर होत नसेल तर मिश्रण थोडा वेळ परत शिजवावे
  5. मिश्रण दाटसर झाले की गॅस बंद करावा.
  6. गरम असतांनाच मिश्रणाचा पातळ थर प्लास्टीकच्या पेपरवर पसरावा
  7. गार होईपर्यंत दुसऱ्या कढईत तेल गरम करावे त्यात मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी.
  8. त्यावर ओले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. नंतर सुरीने साधारण ५ इंचाच्या पट्ट्या कापाव्यात. त्याची सुरळी/गुंडाळी करावी आणि मग त्या सुरळीचे ३-४ भाग करावेत.
  9. सुरळीच्या वड्यांवर फोडणी कोथिंबीर घालावी
  10. डाळिंबाचे दाणे टाकून सुरळीची वडी सजावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर