Photo of Pav bhaji by Rohini Rathi at BetterButter
891
8
0.0(0)
0

पाव भाजी

Dec-16-2017
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाव भाजी कृती बद्दल

पाव भाजी ही एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध न्याहारी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. आता तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साले काढून कुस्करून
  2. चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे
  3. तीन ते चार मध्यम आकाराचे टोमॅटो
  4. एक वाटी वाटाणे वाफवून
  5. एक मोठी ढोबळी मिरची
  6. बारीक चिरलेली कोबी अर्धा कप
  7. लसुणाच्या पाकळ्या 10 ते 12
  8. दोन मोठा चमचे तेल
  9. एक चमचा जिरे
  10. 1 लिंबाचा रस
  11. मोहरी एक छोटा चमचा
  12. मीठ चवीपुरते
  13. एक मोठा चमचा लाल तिखट
  14. दोन चमचे पावभाजी मसाला
  15. अर्धा टी स्पून हळदी पावडर
  16. हिंग अर्धा टीस्पून
  17. सजवण्यासाठी
  18. बारीक चिरलेली कोथंबीर
  19. बारीक चिरलेला कांदा
  20. लिंबाची फोड
  21. पाव एक डजन

सूचना

  1. कुकरमध्ये बटाटे ढोबळी मिरची चिरलेली कोबी वाटाणे तीन शिट्ट्या घेऊन वाफवून घ्या
  2. थंड झाल्यानंतर सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  3. कांदे टोमॅटो लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  4. हे कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे मोहरी ची फोडणी देउन हिंग टाकावे
  5. बारीक केलेले कांदा-टोमॅटोची प्युरी फोडणी टाकून पाच मिनिटे चांगले परतून घ्यावे
  6. नंतर त्यात लाल मिरची पावडर हळदी पावडर पाव भाजी मसाला टाकून तेल सुटेपर्यंत परतावे
  7. नंतर बारीक केलेले बटाटे वटाणा कोबी ढोबळी मिरची चे मिश्रण मसाले मध्ये टाकावे
  8. मिश्रणाला व्यवस्थित एकत्र करून मीठ टाकून उकळी येऊ पर्यंत शिजवावे
  9. नंतर चिरलेली कोथंबीर घालावी
  10. पाव मध्यभागी चिरून अर्धे करून घ्यावे
  11. तव्यावर तुप अथवा बटर लावुन पाव दोन्ही बाजूने भाजून घ्यावे
  12. खूप गरम गरम पावभाजी सोबत बारीक चिरलेला कांदा व निंबू घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर