मुख्यपृष्ठ / पाककृती / मेदुवडा सांबर

Photo of Meduwada sambar by Archana Lokhande at BetterButter
860
7
0.0(0)
0

मेदुवडा सांबर

Dec-16-2017
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेदुवडा सांबर कृती बद्दल

न्याहारी बेटरबटर

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. उडीद दाळ अर्धा किलो
  2. तेल
  3. तुरडाळ एक वाटी
  4. हरभरा डाळ पाव वाटी
  5. मसूर डाळ पाव वाटी
  6. कांदे दोन
  7. टोमॅटो एक
  8. दुधी भोपळा अर्धा पाव
  9. शेवग्याच्या शेंगा दोन
  10. कडीपत्ता
  11. मोहरी
  12. हिंग
  13. लाल तिखट
  14. हळद
  15. मीठ
  16. आल लसूण पेस्ट दोन चमचे
  17. लाल सुकी मिरची
  18. सांबर मसाला

सूचना

  1. रात्री अर्धा किलो उडीद डाळ भिजत घातली आणि सकाळ सकाळी पाण्यातून काढून वाटून घेतली.
  2. आता सांबरसाठी तुरडाळ, हरभरा आणि मसूर डाळ धुवून घेतली.
  3. कुकरच्या भांड्यात डाळ घेऊन त्यात पाणी, एक कांदा, एक टोमँटो, शेवग्याच्या शेंगा, दुधी भोपळा घालून कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या घेऊन गँस बंद केला.
  4. कुकर थंड झाल्यावर सर्व छान मिक्स करून घेतले.
  5. नंतर कढईत दोन चमचे तेल घालून त्यात एक चिरलेला कांदा आणि आल लसूण पेस्ट घालून परतले.
  6. त्यातच हळद, लाल तिखट, सांबर मसाला घालून परतून शिजवलेली डाळ आणि मीठ घालून मिक्स करून पाच मिनिटे उकळून घेतली.
  7. नंतर तडक्यासाठी कढईत कडीपत्ता, मोहरी, हिंग आणि लाल मिरची घालून छान तडतडले की सांबरवर घालून मिक्स करा.
  8. आता कढईत तेल गरम करून घेतले.
  9. हातावर वाटलेल्या पिठाचा गोळा घेऊन त्यामध्ये बोटाने होल करून किंवा मेदु वडापात्राने वडे बनवून छान तळून घेतले.
  10. डिशमध्ये मेदुवडा आणि सांबर घेऊन डिश सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर