मशरूम मसाला | Mushroom Masala Recipe in Marathi

प्रेषक Poonam Bachhav  |  27th Jan 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Mushroom Masala by Poonam Bachhav at BetterButter
मशरूम मसालाby Poonam Bachhav
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4271

0

मशरूम मसाला

मशरूम मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mushroom Masala Recipe in Marathi )

 • 200 - 250 ग्रॅम्स बटन मशरूम
 • 1 मोठी हिरवी भोपळी मिरची
 • 1 मोठा कांदा
 • 1 मोठा टोमॅटो
 • 2-3 लसणाच्या पाकळ्या
 • 1/2 इंच आल्याचा तुकडा
 • 2 हिरव्या मिरच्या
 • 2-3 मोठे चमचे ताजी साय
 • 2 मोठे चमचे तेल
 • 1/4 लहान चमचा जिरे
 • 1/4 लहान चमचा हळद
 • 2 लहान चमचे लाल तिखट
 • 1 लहान चमचा गरम मसाला
 • 1/2 लहान चमचा कुस्करलेली कसुरी मेथी
 • सजविण्यासाठी ताजी कोथिंबीर
 • मीठ स्वादानुसार

मशरूम मसाला | How to make Mushroom Masala Recipe in Marathi

 1. नळाच्या पाण्यात बटन मशरूमला चांगले धुवा आणि स्वयंपाक घरातील रुमालावर पसरवून कोरडे करा. चाकूने खालचा थोडा भाग कापून काढून टाका. नंतर त्यांचे तुकडे करून बाजूला ठेवा.
 2. आले, लसूण आणि हिरव्या मिरच्या वाटून एक जाडसर पेस्ट बनवा. टोमॅटो आणि कांदा चिरा आणि त्याची बारीक पेस्ट तयार करा
 3. आता एक कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा आणि त्यात जिरे घाला. जिरे तडतडायला लागले की त्यात हिरवी मिरची, आल लसणाची पेस्ट घालून परता. आता त्यात कांदा टोमॅटोची पेस्ट घाला.
 4. उग्र वास जाईपर्यंत या पेस्टला चांगले परता. आता त्यात हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घाला.
 5. तेल सुटेपर्यंत त्याला परता. नंतर त्यात मशरूमचे तुकडे आणि भोपळी मिरची घाला. 1-2 मिनिटे परता. थोडेसे पाणी आणि मीठ घालून मशरूम शिजेपर्यंत झाकण ठेवून शिजवा.
 6. आता त्यात ताजी साय घालून चांगले मिसळा, आणि पुन्हा 2-3 मिनिटे शिजवा. शेवटी कुस्करलेली कसुरी मेथी घालून चांगले मिसळा आणि गस बंद करा.
 7. बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवा आणि पोळी किंवा जीराराईस बरोबर वाढा.

My Tip:

मशरुम्स पाण्यात कधीही भिजवून ठेवू नका, कारण ते पाणी शोषून घेतात आणि गिळगिळीत बनतात आणि डिशची चव बिघडून जाते. अखेरीस किंचित कसुरी मेथी त्या रश्याला एकदम सुगंधी बनवेल.

Reviews for Mushroom Masala Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo