चणे आणि ब्रोकोलीचे कटलेट | Chickpea and Broccoli Cutlets Recipe in Marathi

प्रेषक Neelima Katti  |  28th Jan 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Chickpea and Broccoli Cutlets by Neelima Katti at BetterButter
चणे आणि ब्रोकोलीचे कटलेटby Neelima Katti
 • तयारी साठी वेळ

  8

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1362

0

चणे आणि ब्रोकोलीचे कटलेट recipe

चणे आणि ब्रोकोलीचे कटलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chickpea and Broccoli Cutlets Recipe in Marathi )

 • अर्धी वाटी भिजवलेले आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले काबुली चणे
 • अर्धी वाटी ब्रोकोलीची फुले
 • 1 लहान बारीक चिरलेला कांदा
 • मीठ स्वादानुसार
 • 1 लहान चमचा बारीक चिरलेली मिरची (किंवा स्वादानुसार)
 • 1/4 लहान चमचा धणेपूड
 • चाट मसाला - 1/4 लहान चमचा
 • ताजी कोथिंबीर - 1 लहान जुडी
 • लिंबाचा रस - 1 मोठा चमचा

चणे आणि ब्रोकोलीचे कटलेट | How to make Chickpea and Broccoli Cutlets Recipe in Marathi

 1. काबुली चणे नरम होईपर्यंत किंवा हाताने कुस्करता येतील इतके शिजवा. याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
 2. ब्रोकोलीच्या फुलांना पुरेशा पाण्यात थोडावेळ उकळवून घ्या, नंतर त्याला थंड पाण्यात घाला, ज्यामुळे त्यांचा हिरवा रंग कायम राहील.
 3. नंतर किसणीने ब्रोकोलीला किसून घ्या आणि चण्याच्या मिश्रणात मिसळा.
 4. नंतर या मिश्रणात चिरलेला कांदा, मीठ, धणेपूड, चाट मसाला, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला.
 5. सर्व एकत्र केल्यानंतर याचे गोल किंवा लंबगोलाकार पेटीस बनवा.
 6. 180 अंश सेल्सियस तापमानावर 15 मिनिटे ऐअर फ्राय करा. 10 मिनिटांनंतर त्यांना पलटवा. तुम्हाला तळायचे असतील तर तळू शकता किंवा सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतू पण शकता.
 7. उत्कृष्ट स्वादासाठी गरमागरम वाढा.

My Tip:

मी घट्ट दह्यात लसूण, मीठ आणि मिरपूड घालून पौष्टिक बनवून वाढते.

Reviews for Chickpea and Broccoli Cutlets Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती