तवा कुलछा | Tawa Kulcha Recipe in Marathi

प्रेषक Neelima Katti  |  28th Jan 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Tawa Kulcha by Neelima Katti at BetterButter
तवा कुलछा by Neelima Katti
 • तयारी साठी वेळ

  4

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1625

0

तवा कुलछा recipe

तवा कुलछा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tawa Kulcha Recipe in Marathi )

 • 1 वाटी - मैदा
 • 1 मोठा चमचा - बारीक चिरलेला पुदिना / कोथिंबीर
 • कुलछाला लाटताना आवरणासाठी (लावण्यासाठी):
 • साखर - अर्धा लहान चमचा
 • मीठ - अर्धा लहान चमचा
 • दही - 2 मोठे चमचे
 • कोमट पाणी - 1/4 कप + 2 मोठे चमचे (अंदाजे)
 • तूप / तेल - 2 मोठे चमचे + शिजविण्यासाठी अतिरिक्त
 • बेकिंग सोडा - 1/4 लहान चमचा
 • काळे/पांढरे तीळ - 1 लहान चमचा

तवा कुलछा | How to make Tawa Kulcha Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात पीठ, सोडा आणि मीठ एकत्र करा आणि त्यात साखर घालून चांगले मळा.
 2. तूप आणि दही घाला, मैदा त्यावर लावून घासा, जेणेकरून मैद्यावर त्याचे एक आवरण होईल.
 3. नंतर कोमट पाणी घाला, एका वेळी थोडे थोडे घालून जोपर्यंत मऊ कणिक बनत नाही, तोपर्यंत मळा.
 4. 5 मिनिटांसाठी मळलेले कणिक बाजूला ठेवा, ज्यामुळे त्यातील चिकटपणा दूर होईल आणि एक नरम गोळा तयार होईल.
 5. पुर्ण कणिकेवर तूप लावा आणि एका ओल्या कापडाने किंवा क्लिंग फिल्मने झाका आणि 3-4 तासांसाठी बाजूला ठेवा. (कुलछे नरम होण्यासाठी हे करणे अतिशय आवश्यक आहे)
 6. सुमारे 4 तासानंतर, त्या कणिकेचे 8-10 एकसमान गोळे तयार करा.
 7. एक गोळा घ्या, त्याचा पृष्ठभाग थोडासा ओला करा, आणि त्यावर चिरलेला पुदिना/कोथिंबीर, काळे आणि पांढरे तीळ लावा. एका सपाट जागेवर पीठ शिंपडून गोळ्याला पोळीसारखे लाटा, पोळीपेक्षा थोडे जाड ठेवा.
 8. त्या दरम्यान तवा गरम करा, त्यावर थोडे तूप घाला आणि त्यावर कुलछा घाला. कुलछा वरील बाजूस थोडा फुलू लागला की त्याला उलट करा, तूप लावा आणि दोन्ही बाजूंनी एकसमान भाजा.
 9. तूपाबरोबर किंवा घरी बनविलेल्या लोण्याबरोबर गरमगरम कुलछा वाढा.

Reviews for Tawa Kulcha Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo