मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरी टिक्की

Photo of Bajari Tikki by Archana Lokhande at BetterButter
602
6
0.0(0)
0

बाजरी टिक्की

Dec-20-2017
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरी टिक्की कृती बद्दल

बाजरी टिक्की

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बाजरीचे पीठ १ वाटी
  2. २ चमचे बेसन
  3. १ चमचा तेल
  4. १ चमचा धने पावडर
  5. २ चमचे तीळ
  6. १ चमचा जिरे पूड
  7. २ चमचे लिंबू रस
  8. १/४ चमचा हळद
  9. २ चमचे लाल तिखट
  10. १/४ चमचा साखर
  11. १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मेथी
  12. मीठ
  13. तेल
  14. पाणी

सूचना

  1. एका बाऊलमध्ये १ वाटी बाजरीचे पिठ, २ चमचे बेसन,१ चमचा तेल,१ चमचा धने पावडर ,२ चमचे तिळ, १ चमचा जिरे पुड, दोन चमचे लिंबू रस, पाव चमचा हळद, दोन चमचे लाल तिखट, पाव चमचा साखर, एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबिर आणि मेथी, मीठ चवीप्रमाणे घालून सर्व छान मिक्स करून घ्या.
  2. आता गँसवर तवा किंवा कढई गरम करण्यास ठेवा.
  3. तोपयँत वरील मिश्रणात थोडे पाणी घालून मळून घ्या आणि हाताला थोडे तेल लावून तयार मिश्रणाची टिक्की बनवा.
  4. तव्यात थोडे तेल घालून टिक्की सँलो फ्राय करा किंवा तेलात तळून घ्या. मी सँलो फ्राय केले. दोन्ही बाजूने तेल सोडून टिक्की छान खरपूस होईपर्यंत फ्राय करा.
  5. आता ही तयार बाजरी टिक्की साँस किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर