मुख्यपृष्ठ / पाककृती / डिस्क सँडविच

Photo of Disc sandwhich by Rohini Rathi at BetterButter
748
8
0.0(0)
0

डिस्क सँडविच

Dec-20-2017
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डिस्क सँडविच कृती बद्दल

सँडविच लहान मुलांना आवडणारी न्याहारी आहे त्यात वेगळ्या पद्धतीने बनवलेला सँडविच लहान मुले आनंदाने खाता याप्रकारे बनवलेल्या सँडविच डिस्क प्रमाणे दिसतो म्हणून याला डिस्क सँडविच असे म्हणतात

रेसपी टैग

  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेडच्या स्लाईसेस 6
  2. टोमॅटो केचप दोन टेबल स्पून
  3. चीज एक टेबल स्पून
  4. लोणी दोन टेबल स्पून
  5. सँडविच सारणासाठी
  6. किसलेला गाजर 1
  7. किसलेली कोबी अर्धा वाटी
  8. वटाना अर्धा कप
  9. बारीक चिरलेला कांदा एक
  10. बारीक चिरलेला टोमॅटो एक
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल एक छोटा चमचा

सूचना

  1. प्रथम 6 ब्रेडच्या स्लाईसेस गोलाकार कापून घ्याव्यात
  2. त्यातील तीन स्लाईसवर छोट्या गोलाकार कटरने मधला भाग कापून घ्यावा
  3. एका कढईत तेल गरम करून बारीक किसलेला कोबी गाजर कांदा टोमॅटो हिरवी मिरची मीठ घालून परतून घ्यावी
  4. एका छोट्या भांड्यात टोमॅटो केचप लोणी आणि चीज एकत्र करून एकजीव करून घ्यावे
  5. सँडविच साठी प्रथम मोठी गोलाकार स्लाईस घेऊन ची केचप लोण्याचे मिश्रण चमच्याच्या साह्याने लावून घ्यावे
  6. टोमॅटो केचप लालचावलेल्या स्लाईसवर मध्यभागी कापलेली दुसरी स्लाईस ठेवावी
  7. नंतर तयार सारण गोलाकार डिस्कच्या भागात घालून दाबून घ्यावे
  8. अशा प्रकारे तीन ही सँडविच तयार करून
  9. चार मिनिटे मायक्रोवेव्ह मध्ये बेक करावे 180 बेक करावे
  10. तयार सँडविच की टोमॅटो केचप सोबत खावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर