Photo of Rice flour noddles by Rohini Rathi at BetterButter
637
8
0.0(0)
0

Rice flour noddles

Dec-20-2017
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. एक कप तांदळाचे पीठ
  2. एक चमचा तेल
  3. पाणी पीठ मळण्यासाठी
  4. बारीक चिरलेला कांदा एक
  5. बारीक चिरलेला टोमॅटो एक
  6. बारीक चिरलेली शिमला मिरची अर्धा कप
  7. वटाणा अर्धा कप
  8. बारीक चिरलेला गाजर अर्धा कप
  9. टोमॅटो केचप 2 tbsp
  10. एक टेबल स्पून लाल मिरची
  11. अर्धा टीस्पून हळद
  12. तेल एक चमचा
  13. मोहरी एक टिस्पून
  14. बारीक चिरलेली कोथंबीर सजवण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम तांदळाच्या पिठात तेल आणि मीठ घालून एकत्र करून घ्यावे
  2. तांदळाचे पीठ मध्यम मळून घ्यावे
  3. शेव यंत्राला तेलाने ग्रीस करून घ्यावे
  4. एका कढईत पाणी ठेवून जाळी असलेली प्लेट वरती ठेवावे
  5. शेव यंत्रामध्ये तांदळाचे पीठ घालून शेव प्रमाणे नूडल्स जाळीदार प्लेट वर बनवून घ्याव्यात
  6. दहा मिनिटे मंद आचेवर नूडल्स वाफवून घ्याव्यात
  7. नूडल्स थंड करायला ठेवावे
  8. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हळद लाल मिरची पावडर बारीक चिरलेली सर्व भाजी शिजवून घ्यावे
  9. नंतर टोमॅटो केचप घालून सर्व भाज्या एकजीव करावे
  10. थंड झालेले नूडल्स वरील भाज्यांच्या मिश्रणात घालून हलक्या हाताने परतावे
  11. चवीनुसार मीठ घालून दोन मिनिटे टॉस करून घ्याव्यात
  12. अशाप्रकारे घरी बनवलेल्या तांदळाच्या पिठाच्या नूडल्स तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर