Photo of Sweet stick by Teesha Vanikar at BetterButter
1408
5
0.0(0)
0

गोड शेव

Dec-20-2017
Teesha Vanikar
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड शेव कृती बद्दल

ही शेव गुलाची ही बनते,पण मी साखरेची बनवली

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. १वाटी बेसन
  2. १वाटी साखर
  3. १वाटी पाणी
  4. रोझ ईन्सेन्स
  5. चुटकी भर बेकिंग सोडा
  6. चुटकीभर मीठ
  7. शेव तलायला तेल

सूचना

  1. प्रथम बाऊलमध्ये बेसन घेतले
  2. त्यात मीठ, सोडा टाकुन पीठ भिजवुन घेतले
  3. आता कढ़ाईत तेल तापत ठेवले
  4. दुसर्या गैस वर पातेलीत १वाटी पाणी तापत ठेवले
  5. त्यात साखर घालुन पाक १तारी करण्यास ठेवला
  6. शेवपात्राला शेवेची चकती लावली तेल लावुन बेसनाचा गोळा भरला
  7. कढाईवर शेवपात्र धरून शेव पाडली आणि तळली
  8. पाक झाल्यावर थंड केलेली शेव पाकात घातली
  9. शेव जाड चमच्याने किवां रवी ने सतत मिक्स करत राहीले
  10. जोवर शेव मोकळी होत नाही
  11. शेव मोकळी व्हायला खूप वेळ लागतो
  12. पाक शेवेवर चिकटला की शेव पांढरट झाली
  13. व शेव ही मोकळी झाली
  14. आपली शेव टी टाइम साठी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर