मुख्यपृष्ठ / पाककृती / इडली सांबर

Photo of Idli sambar by Rohini Rathi at BetterButter
3551
4
0.0(0)
0

इडली सांबर

Dec-20-2017
Rohini Rathi
720 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडली सांबर कृती बद्दल

इडली सांबर दक्षिण भारतीय न्याहारी आहे हे पचण्यास एकदम हलकी आहे खाण्यास पण खूपच स्वादिष्ट आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • साऊथ इंडियन
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. इडली साठी
  2. तांदूळ 3 वाटी
  3. एक वाटी उडीद डाळ
  4. खाण्याचा सोडा पाव चमचा
  5. तीन चमचे दही
  6. चवीनुसार मीठ
  7. पोहे अर्धा कप
  8. मेथी दाणे पाव कप
  9. सांबर बनवण्यासाठी
  10. तुर दाळ एक कप
  11. हरभरा दाळ दोन टेबल स्पून
  12. मुगडाळ 2 टेबल स्पून
  13. कांदा बारीक चिरलेला एक
  14. टोमॅटो बारीक चिरलेला एक
  15. वटाणा अर्धा काप
  16. चिंच अर्धा कप
  17. सांबर मसाला दोन चमचे
  18. लाल मिरची पावडर एक टेबल स्पून
  19. हळद अर्धा टीस्पून
  20. चवीपुरते मीठ
  21. बटाटा एक
  22. शेवग्याची शेंग एक
  23. तेल 2 टेबल स्पून
  24. मोहरी अर्धा टीस्पून
  25. हिंग अर्धा टीस्पून

सूचना

  1. प्रथम तांदूळ डाळ दोन वेगवेगळे भिजत टाकावे सोबत मेथी दाणे भिजत ठेवावे
  2. सात ते आठ तासांनंतर 2 घेतलेले पोहे तांदूळ डाळ व मेथी दाना मिसरमधून रवाळ वाटून घ्यावा
  3. ते पीठ चार ते पाच तास आंबवण्य स ठेवावे
  4. नंतर इडली करण्याच्या वेळी त्यात सोडा घालून मिश्रण ढवळून घ्यावे
  5. नंतर इडलीपात्राला तेल लावून त्यात प्रत्येक साचा थोडे थोडे पीठ टाकून इडल्या कराव्यात
  6. सात ते आठ मिनिटे त्यांना वाफ आणावी
  7. थंड झाल्यानंतर चमचा साह्याने इडली काढून घ्यावी
  8. सांबर बनवण्यासाठी
  9. प्रथम तुरडाळ मुगडाळ व हरभराडाळ स्वच्छ पाण्याने धुऊन कुकरमध्ये चार शिट्या घेऊन शिजवून घ्यावी
  10. एका कढईमध्ये तेल गरम त्यात हिंग मोहरीची फोडणी देऊन बारीक चिरलेला कांदा टोमॅटो वटाणा बटाटा शेवग्याची शेंग पाच मिनिटे वाफवून घ्यावी
  11. कांदा टोमॅटो बटाटा शेवग्याची शेंग व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात लाल मिरची पावडर सांबर मसाला हळद घालून मिश्रण तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे
  12. नंतर शिजलेल्या डाळीत त्यात घालून पाणी टाकून उकळी येईपर्यंत शिजवावे
  13. चिंचेचा कोळ व गूळ व मीठ घालून एक उकळी येईपर्यंत हलवत राहावे
  14. बारीक चिरलेली कोथंबीर टाकून सांबर इडली सोबत खावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर