Photo of MIX veg bread roll by Minal Sardeshpande at BetterButter
998
4
0.0(2)
0

MIX veg bread roll

Dec-20-2017
Minal Sardeshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. एक स्लाइस ब्रेड
  2. 2 उकडलेले बटाटे
  3. एक वाटी मटार
  4. पाव वाटी गाजर
  5. अर्धी वाटी स्वीट कॉर्न
  6. पाव वाटी फ्लॉवर
  7. दोन कांदे
  8. अर्धा चमचा गरम मसाला
  9. एक चमचा लाल तिखट
  10. आलं लसूण पेस्ट एक चमचा
  11. दोन चमचे तेल
  12. मीठ
  13. कोथिंबीर
  14. मैदा दोन चमचे
  15. मक्याचे पीठ दोन चमचे
  16. हळद
  17. पाणी
  18. तेल तळणीसाठी

सूचना

  1. कांदे बारीक चिरा.
  2. बटाटे उकडून घ्या
  3. सोलून कुस्करून घ्या.
  4. फ्लॉवर बारीक करून, वाफवून घ्या.
  5. गाजर किसून घ्या.
  6. मटार सोलून घ्या, वाफवून घ्या.
  7. कोथिंबीर चिरून घ्या.
  8. कॉर्न उकडून दाणे काढून थोडे मिक्सरला फिरवून घ्या.
  9. आलं लसूण पेस्ट करा.
  10. कढईत तेल तापत ठेवा.
  11. त्यात कांदा टाकून परता
  12. आलं लसूण पेस्ट घालून परता.
  13. आता त्यात गरम मसाला, तिखट घाला.
  14. गाजर, मटार, बटाटा, कॉर्न, फ्लॉवर सगळ्या भाज्या घालून परता
  15. मीठ घाला.
  16. नीट मिक्स करून चव बघा.
  17. रोलचा आकार द्या.
  18. ब्रेडचा कडा काढून घ्या
  19. एक पसरट भांड्यात पाणी घेऊन त्यात स्लाईस बुडवून बाहेर काढावा
  20. लगेच पाणी काढून टाका
  21. भाजीचा रोल स्लाईसमध्ये ठेवून मुटका करा.
  22. दोन चमचे मैदा आणि दोन चमचे मक्याचे पीठ , थोडीशी हळद, मीठ एकत्र करून पातळसर मिश्रण करा.
  23. तयार ब्रेड रोल या मिश्रणात बुडवून तळा.
  24. चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Neela Abhyankar
Dec-28-2017
Neela Abhyankar   Dec-28-2017

Chan

Rohini Gune-Sardeshpande
Dec-28-2017
Rohini Gune-Sardeshpande   Dec-28-2017

सुरेख

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर