मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर कोफ्ता

Photo of Paneer Kofta by Ritu Sharma at BetterButter
3089
386
4.5(0)
0

पनीर कोफ्ता

Jul-24-2015
Ritu Sharma
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर कोफ्ता कृती बद्दल

दुसरी नमुनेदार पंजाबी डिश! मसालेदार रश्यात तळलेले पनीरचे गोळे

रेसपी टैग

  • व्हेज
  • पंजाबी
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. 250 ग्रॅम्स पनीर, किसलेले
  2. 2 उकडलेले आणि कुसकरलेले बटाटे
  3. 3 टोमेटो
  4. 1 चिरलेला कांदा
  5. 1 चिरलेली हिरवी मिरची
  6. 3/4 कप पाणी
  7. 2 मोठे चमचे तेल
  8. 2 मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर
  9. 2 मोठे चमचे कापलेले काजू
  10. दीड मोठे चमचे बेसन
  11. 2 लहान चमचे आले-लसणाची पेस्ट
  12. अर्धा लहान चमचा लिंबाचा रस
  13. अर्धा लहान चमचा किसलेले आले
  14. अर्धा लहान चमचा जिरे
  15. 1/4 लहान चमचा गरम मसाला
  16. दीड लहान चमचा धणेपूड
  17. अर्धा लहान चमचा सुकलेली कसुरी मेथी
  18. 1/4 लहान चमचा हळद पूड
  19. 2 लवंग
  20. अर्धा इंच दालचिनीचा तुकडा
  21. तळण्यासाठी तेल
  22. मीठ स्वादानुसार

सूचना

  1. एका वाडग्यात किसलेले पनीर, कुसकरलेले बटाटे, हिरवी मिरची, आले, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घ्या.
  2. त्यांना चांगले मिसळा आणि लहान चपटे गोळे बनवा.
  3. नंतर एका कढईत तेल गरम करा आणि कोफ्ते बदामी होईपर्यंत तळा.
  4. आता काजू दोन मोठे चमचे पाणी घालून वाढून घ्या आणि टोमॅटो वेगळे वाटून घ्या.
  5. दुसऱ्या कढईत 1 लहान चमचा तेल गरम करा, त्यात जिरे, लवंग, दालचिनी आणि आले-लसणाची पेस्ट घाला. याला काही सेकंदांसाठी परता.
  6. आता त्यात कांदा घालून बदामी होईपर्यंत परता. त्यात वाटलेल्या टोमॅटोची प्युरी घाला आणि काही मिनिटे शिजवा.
  7. जेव्हा मिश्रण तेल सोडण्यास सुरुवात करेल, तेव्हा काजूची पेस्ट, लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड, हळद आणि गरम मसाला घाला.
  8. शेवटी यात 3/4 कप पाणी आणि कसुरी मेथी घाला. आता रस्सा उकळू द्या.
  9. नंतर रश्यात कोफ्ते सोडा आणि कोथांबिरीने सजवा.
  10. याला भात/पोळी/पराठे या सोबत गरमागरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर