Idli Dhokala | Idli Dhokala Recipe in Marathi

प्रेषक Archana Lokhande  |  20th Dec 2017  |  
4 from 1 review Rate It!
 • Photo of Idli Dhokala by Archana Lokhande at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

1

Idli Dhokala

Idli Dhokala बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Idli Dhokala Recipe in Marathi )

 • १ वाटी बेसन
 • १/२ वाटी रवा
 • १ वाटी दही
 • २ चमचे ओल्या नारळाचा खोवलेला चव
 • कोथिंबिर
 • ३-४ चमचे तेल
 • १ चमचा मोहरी
 • १०-२० कडीपत्ता
 • २-३ चमचे साखर
 • १ चमचा इनो फ्रुट साँल्ट
 • मीठ चवीनुसार
 • १ चमचा आल लसूण पेस्ट
 • १/४ चमचा हळद
 • एका लिंबाचा रस

Idli Dhokala | How to make Idli Dhokala Recipe in Marathi

 1. एका मोठ्या बाउलमध्ये बेसन चाळून घ्या.
 2. ज्या भांड्यात इडली ढोकला करंणार आहोत त्यात पाणी घालून गॅस वर ठेवून गरम करायला ठेवा.
 3. बेसन मध्ये दही आणि रवा घालून मिक्स करा व, त्यात पाणी घालून बॅटर तयार करा. ह्या मिश्रणामध्ये मीठ, आल पेस्ट व २ चमचे लिंबाचा रस घालून नीट एकजीव करा. २ छोटे चमचे साखर, १/२ छोटा चमचा हळद पावडर घालून नीट मिक्स करा. बेसन व्यवस्थित फाटून १० मिनीटे झाकून ठेवा.
 4. बॅटरमध्ये इनो फ्रूट् सॅाल्ट घालून बॅटर घोळवून घ्या. इडली खाचांमध्ये चमच्यांनी बॅटर घाला. सगळे घाणे भरून ईडली स्टॅंड लावून घ्या.
 5. इडल्या शिजण्यासाठी स्टॅंड पाणी भरलेल्या पातेल्यात , त्यावर झाकण ठेवून द्या. गॅस मंद ठेवा म्हणजे पाणी उकळत राहील आणि लवकर सुकणार नाही.
 6. १५ मिनीटे बॅटर वाफेवर शिजवा. नंतर तपासून बघा. इडली शिजली का पाहतांना सुरीचे टोक इडली ढोकळ्यात आत घालून पहा जर बॅटर चिकटले नाही तर समजा इडली ढोकला तयार आहे.
 7. गॅस बंद करा व इडली स्टॅंड पातेल्यातून बाहेर काढून थंड करायला ठेवा.
 8. एका छोट्या कढईत २-३ छोटे चमचे तेल गरम करा, तेल तापलं की मोहरी घाला, मोहरी तडतडली की कढीपत्ता घालून जरा तळून घ्या. त्यात १/२ कप पाणी, मीठ व साखर घाला. उकळ आल्यावर गॅस बंद करा.
 9. चाकुनी इडल्या साच्यातून बाहेर काढा व प्लेट मध्ये ठेवा. तडक्याला चमच्यांनी इडली ढोकळ्यावर घाला बारीक चिरलेली कोथिंबीर व किसलेला नारळ वरून घाला व सजवा.
 10. इडली ढोकळा आपण टोमॅटो सॅास, हिरवी कोथिंबीर चटणी, नारळाची चटणी किंवा आपल्या आवडत्या चटणी बरोबर खाऊ शकतो.

Reviews for Idli Dhokala Recipe in Marathi (1)

BetterButter Editorial2 years ago

Hi Archana, this image appears to be hazy and unclear, kindly delete this image and upload a clear image of this dish at the earliest. To edit the recipe, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the recipe. Thanks!
Reply