Photo of Cream of Tomato Soup by Nayana Palav at BetterButter
1049
29
0.0(16)
3

Cream of Tomato Soup

Dec-23-2017
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Cream of Tomato Soup कृती बद्दल

सध्या हिवाळा ऋुतू चालू आहे, अशा हया थंड हवेत गरम गरम सूप पिण्याच सूख काही औरच असत. लहान मुलांना हे सूप फार आवडते. याची आंबट, गोड चव लहान थोर सगळयांना आवडते. तुम्हाला माहीत आहे का हे सूप सर्वप्रथम मारीया पारलोव्हा हीने १८७२ मध्ये बनवले होते. दिवसें दिवस या सूप ची प्रसिद्धी वाढत गेली. हे सूप तुम्ही घरी पण बनवू शकता. चला तर पाहू याची कृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • ब्रिटीश
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. टोमॅटो:tomato: ५०० ग्राम
  2. २ टीस्पून साखर किंवा चवीनुसार
  3. १ टेबलस्पून कॉर्नफ्लावर (सूप ला दाटपणा येण्यासाठी)
  4. लोणी १ टेबलस्पून
  5. ४ पाकळया लसूण
  6. १/४ टीस्पून मिरीपूड
  7. मीठ चवीनुसार
  8. क्रीम किंवा फेसलेली दुधाची साय सजावटी साठी
  9. कृटाॆन्स (पावाचे भाजलेले तुकडे) सजावटीकरता
  10. पाणी (आवश्यकतानुसार)

सूचना

  1. प्रथम टोमॅटो स्वच्छ धूवून घ्या.
  2. एका भांडयात पाणी घेउन गॅस वर ठेवा, गॅस चालू करा.
  3. पाण्याला उकळी आली की त्यात टोमॅटो घाला.
  4. ५ मिनिटे उकळू दया.
  5. नंतर गॅस बंद करुन, टोमॅटो थंड होउ दया.
  6. आता टोमॅटो ची साले काढा.
  7. टोमॅटो ची मिक्सर मध्ये किंवा ब्लेंडर ने प्यूरी करा.
  8. आता ही प्यूरी चाळणी ने गाळून घ्या.
  9. आता एक भांडे गॅस वर ठेवा.
  10. त्यात लोणी घाला.
  11. लसूण, कॉर्नफ्लावर, घाला. नीट चमच्याने ढवळत रहा.
  12. आता टोमॅटो प्यूरी घाला. मीठ घाला.
  13. साखर घाला. मिरीपूड घाला. नीट ढवळत रहा.
  14. म्हणजे गुठळया होणार नाही.
  15. तयार आहे तुमचे चविष्ट सूप, क्रीम व कृटोन्स ने सजवा.
  16. गरम गरम वाडग्यात (bowl) मध्ये वाढा.

रिव्यूज (16)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sachin Mali
Dec-30-2017
Sachin Mali   Dec-30-2017

Superb..

Sushma Patil
Dec-29-2017
Sushma Patil   Dec-29-2017

Very testy & Healthy soup

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर