मुख्यपृष्ठ / पाककृती / गोबी मंचुरियन

Photo of Gobhi Manchurian by Anushka Basantani at BetterButter
2433
613
4.7(0)
0

गोबी मंचुरियन

Jul-06-2015
Anushka Basantani
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • बॅचरल्स
  • फ्युजन

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा कप कॉर्नफ्लोर
  2. 5 मोठे चमचे मैदा
  3. अर्धा कप पाणी
  4. 1 मोठा चमचा तांदळाचे पीठ
  5. 1 मध्यम आकाराच्या कॉलिफ्लॉवरची फुले (लहान लहान फुलांच्या आकाराचे तूकडे घ्या)
  6. रुचीनुसार मीठ
  7. 1 मोठा चमचा आले-लसणाची पेस्ट
  8. 1 मोठा कांदा बारीक चिरलेला
  9. 2 हिरव्या मिरच्या लांब चिरलेल्या
  10. 1 मध्यम आकाराच्या शिमला मिरचीचे चौरस आकारात कापलेले तुकडे
  11. 1 मोठा चमचा सोया सॉस
  12. अर्धा मोठा चमचा चिली सॉस
  13. 1 मोठा चमचा टोमॅटो सॉस
  14. अर्धा लहान चमचा काश्मिरी लाल मिरची पूड किंवा देगी मिरची
  15. कांद्याची पात 1 इंचाच्या तुकड्यात कापलेली

सूचना

  1. कॉलिफ्लॉवरच्या फुलांना चांगले धुऊन घ्या. नंतर कॉलिफ्लॉवरला उकळत्या पाण्यात घाला आणि मध्यम आचवर मीठ घालून 10-15 मिनिटे शिजवा. शिजविल्यानंतर राहिलेले अतिरिक्त पाणी निथळून घ्या आणि बाजूला काढून ठेवा.
  2. एका भांड्यात तांदळाचे पीठ, मैदा, कॉर्नफ्लोर, मीठ आणि आले-लसणाची पेस्ट मिसळा. मग त्यात ते जाड होईपर्यंत हळू-हळू पाणी मिसळत रहा. आता त्यात कॉलिफ्लॉवर घालून चांगले मिसळा.
  3. कढईमध्ये मध्यम आचवर तेल गरम करा. हळू-हळू 6-8 कॉलिफ्लॉवरचे तुकडे तेलात टाका आणि बदामी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
  4. एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करा, त्यात आले-लसणाची पेस्ट, कांदा आणि शिमला मिरची घाला. 3-4 मिनिटांपर्यंत हलके तळा.
  5. त्यात सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस, मीठ आणि देगी मिरची मिसळा. 1 किंवा 2 मिनिटे शिजवा.
  6. आता या सॉसमध्ये देखील कॉलिफ्लॉवरचे तुकडे घाला आणि त्यांना चांगल्या रीतीने मिसळा.
  7. कांद्याची पात आणि हिरव्या मिरच्यांनी सजवा आणि गरम-गरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर