मुख्यपृष्ठ / पाककृती / मटार करंजी

Photo of Matar Karanji by Archana Lokhande at BetterButter
1530
11
0.0(0)
0

मटार करंजी

Dec-25-2017
Archana Lokhande
15 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार करंजी कृती बद्दल

मटार करंजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. १/२ किलो मटारचे सोललेले दाणे
  2. २ वाटी मैदा
  3. १ मोठा चमचा तांदळाचे पीठ / रवा
  4. २ उकडलेले बटाटे
  5. ६-७ लसूण पाकळी
  6. १ इंच आल
  7. लिंबू
  8. ५-६ हिरव्या मिरच्या
  9. १ चमचा धने जिरे पूड
  10. १/४ चमचा हळद
  11. २-३ मोठे चमचे ओले खोबरे खवलेले
  12. कोथिंबिर
  13. ओवा
  14. तेल
  15. मीठ

सूचना

  1. प्रथम एका ताटात मैदा, तांदळाचे पीठ,ओवा,मीठ आणि एक चमचा तेल घालून पिठ मळून झाकून ठेवले.
  2. कढईत थोडे तेल घालून त्यात मटार घालून थोडे भाजून घेतले.
  3. मटार थंड झाल्यावर मिक्सरवर जाडसर वाटून घेतले.
  4. आल-लसूण-मिरची ही मिक्सरवर वाटून घेतली.
  5. आता कढईत दोन चमचे तेल घालून मिरची पेस्ट परतून घेतली.
  6. त्यातच धने जिरेपूड, हळद ,किसलेला बटाटा आणि ओले खोबरे घालून मिक्स करून घेतले.
  7. नंतर मटार,लिंबू आणि मीठ घालून दोन ते तीन मिनीट परतून गँस बंद केला.
  8. दुसऱ्या कढईत कमी गँसवर तेल गरम करण्यास ठेवले.
  9. नंतर मैद्याचे छोटे गोळे करून गोल लाटून करंजीच्या साच्यात ठेवून त्यावर तयार मटारचे मिश्रण ठेवून साचा बंद करून करंजी बनवून घेतली.
  10. याप्रमाणेच सगळ्या करंज्या बनवून घेतल्या.
  11. गरम तेलात करंजी खरपूस सोनेरी कुरकुरीत होईपयँत छान तळून घेतली.
  12. आता सर्व्हिंग डिशमध्ये तयार मटार करंजी आणि साँस किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर