कुळीथ सूप | HORSE Gram soup Recipe in Marathi

प्रेषक Minal Sardeshpande  |  27th Dec 2017  |  
4.7 from 7 reviews Rate It!
 • Photo of HORSE Gram soup by Minal Sardeshpande at BetterButter
कुळीथ सूपby Minal Sardeshpande
 • तयारी साठी वेळ

  16

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

22

7

20 votes
कुळीथ सूप recipe

कुळीथ सूप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make HORSE Gram soup Recipe in Marathi )

 • शिजलेल्या कुळथाचे पाणी 3 वाट्या
 • ताक चार वाट्या
 • नारळाचे दूध चार वाट्या
 • मिरच्यांचे वाटप एक चमचा
 • लसूण पेस्ट एक चमचा
 • साखर दोन चमचे
 • मीठ
 • फोडणी साठी दोन चमचे तेल
 • पाव चमचा हिंग
 • पाव चमचा मोहोरी
 • पाव चमचा हळद
 • मूठभर कोथिंबीर

कुळीथ सूप | How to make HORSE Gram soup Recipe in Marathi

 1. एक वाटी कुळीथ रात्री चार पाच वाट्या पाणी घालून भिजवा.
 2. कुळीथ
 3. सकाळी चाळणीवर काढा
 4. झाकून ठेवा, मोड येऊ द्या.
 5. मोड आल्यावर कुळीथ निवडून चार वाट्या पाणी घालून शिजवा.
 6. त्यातील पाणी काढून घ्या.
 7. हे शिजलेल्या कुळथाचे पाणी 3 वाट्या घेऊन गार करा.
 8. मिरच्यांची, लसूण पेस्ट करा.
 9. पूर्ण गार झाल्यावर त्या पाण्यात आपल्याला पाण्याच्या अडीच पट नारळाचं दूध आणि ताक मिसळायचं आहे.
 10. नारळाचं दूध काढून घ्या.
 11. कुळथाच्या पाण्यात नारळाचे दूध चार वाट्या, ताक चार वाट्या, मिरची पेस्ट, लसूण पेस्ट, मीठ, साखर घालून ढवळा.
 12. कढईत तेल घ्या.
 13. मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करा.
 14. ती तयार सूपला द्या.
 15. लागल्यास चव बघून मीठ साखर वाढवा.
 16. कोथिंबीर धुवा आणि बारीक चिरून घ्या.
 17. सूप सर्व्ह करताना फक्त गरम करा, उकळू नका.
 18. वरून कोथिंबीर घालून सूप प्या
 19. उकळी काढल्यास सूप फुटण्याची शक्यता असते.
 20. याला कळण असेही म्हणतात.
 21. शिजलेल्या कुळथाची उसळ छान होते, ते फुकट जात नाहीत.

My Tip:

कुळीथ भिजवण्याचा वेळ करण्यात धरलेला नाही. फोडणी नको असेल तर नुसता हिंग घाला, पण हिंग मात्र हवाच!

Reviews for HORSE Gram soup Recipe in Marathi (7)

सौ. राजश्री महानाड2 years ago

मस्त मस्त
Reply

Rakshanda Sawant2 years ago

mast
Reply

Girish Joshi2 years ago

Delicious
Reply
Minal Sardeshpande
2 years ago
थँक्स

Nilima Gore2 years ago

Yummy
Reply
Minal Sardeshpande
2 years ago
थँक्स

Rohini Gune-Sardeshpande2 years ago

छानच
Reply

Nayana Palav2 years ago

My fav
Reply

मंदार कात्रे2 years ago

Wow
Reply
Minal Sardeshpande
2 years ago
थँक्स