मिश्र भाज्यांचे सुप | Mix Veg Soup Recipe in Marathi

प्रेषक Renu Kulkarni  |  27th Dec 2017  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Mix Veg Soup by Renu Kulkarni at BetterButter
मिश्र भाज्यांचे सुपby Renu Kulkarni
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

1

1 vote
मिश्र भाज्यांचे सुप recipe

मिश्र भाज्यांचे सुप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix Veg Soup Recipe in Marathi )

 • लाल टोमॅटो 4 मोठे
 • कांदा 1 छोटा
 • बटाटा 1 छोटा
 • बीट 2 टेबलस्पून चिरून
 • गाजर 2 टेबलस्पून चिरून
 • कलमी (दालचिनी ) पूड 1/4 टीस्पून
 • लवंग पूड 1/4 टीस्पून
 • मीरे पूड 1 टीस्पून
 • मीठ 1 टीस्पून
 • साखर 3 टीस्पून
 • तूप 2 टीस्पून
 • पाणी 4 वाटी

मिश्र भाज्यांचे सुप | How to make Mix Veg Soup Recipe in Marathi

 1. टमाटे. .कांदा..बटाटा बारीक चिरून घ्या.
 2. प्रेशर कुकर मधे तूप घालून गरम करून त्यात चिरून ठेवलेल्या भाज्या घालून परतून घ्या.
 3. कलमी व लवंग पूड ...साखर व मीठ घालून परतून घ्या.
 4. 1 .5 वाटी पाणी घालून ढवळून मध्यम आचेवर 2 शिट्टया येउ देत.
 5. गार झाल्यावर मिक्‍सरवर बारीक करून घ्या.
 6. मिरपूड व 2.5 वाटी पाणी घालून ढवळून उकळा.
 7. गरमागरम सूप सर्व्ह करावे.

My Tip:

घरची दुधाची साय घोटून घाला...छानच लागते. ..व सुंदर दिसते.

Reviews for Mix Veg Soup Recipe in Marathi (1)

Nayana Palav2 years ago

Wow
Reply