Photo of ALU Vadi by Minal Sardeshpande at BetterButter
1544
11
0.0(3)
0

ALU Vadi

Dec-28-2017
Minal Sardeshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ALU Vadi कृती बद्दल

टी टाईम स्नॅक्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. पाच अळूची पाने
  2. पाव वाटी चिंचेचा कोळ
  3. पाव वाटी गूळ
  4. दीड चमचा लाल तिखट
  5. पाव चमचा हळद
  6. तीन वाट्या पाणी
  7. दोन वाट्या थालिपीठ भाजणी
  8. अर्धी वाटी तेल
  9. अर्धा चमचा मोहोरी
  10. पाव वाटी ओलं खोबरं
  11. मीठ
  12. कोथिंबीर

सूचना

  1. अळूची पानं धुवून पुसून घ्या.
  2. त्याच्या शिरा काढून घ्या.
  3. एका भांड्यात भाजणी घ्या.
  4. त्यात तिखट मीठ चिंच गूळ घाला.
  5. आपण तीन वाट्या पाणी घेतलंय त्यातलं लागेल तसं घाला.
  6. पानावर लावता येईल असं मिश्रण व्हायला हवं
  7. पान उलट करा.
  8. त्याच्या मागच्या बाजूला पीठ लावा.
  9. समोरच्या पानाच्या बाजू दुमडा, त्यावर पीठ लावा.
  10. पीठ लावलेलं पान
  11. त्यावर परत एक पान ठेवा.
  12. त्यालाही असंच पीठ लावा.
  13. दोन्ही बाजू दुमडा आणि गुंडाळी करा.
  14. गुंडाळीला दोरा बांधून घ्या.
  15. तयार गुंडाळ्या चाळणीत ठेवून मोदकासारखे 20 मिनिटं वाफवून घ्या.
  16. गुंडाळी गार करून त्याचे गोल काप करून तळा.
  17. अळूवडी
  18. पण याचा अजून एक प्रकार करता येतो.
  19. अळूवडी करून घ्यावी.
  20. कढईत तेल तापवावे.
  21. त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी.
  22. त्यात चिरलेल्या अळूवड्या घालून परता.
  23. त्यावर खोबरं कोथिंबीर घाला.
  24. भाजणीची अळूवडी खमंग आणि पौष्टिक !
  25. टी टाईम हेल्दी स्नॅक्स तयार आहे.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Neela Abhyankar
Dec-28-2017
Neela Abhyankar   Dec-28-2017

Yummy

Rohini Gune-Sardeshpande
Dec-28-2017
Rohini Gune-Sardeshpande   Dec-28-2017

झकास

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर