मुख्यपृष्ठ / पाककृती / काळ्या चण्याचे सॅलड

Photo of Kalya chanyache salad by pranali deshmukh at BetterButter
846
7
0.0(0)
0

काळ्या चण्याचे सॅलड

Dec-28-2017
pranali deshmukh
360 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काळ्या चण्याचे सॅलड कृती बद्दल

काळे चणे खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चण्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, लोह आणि खनीज पदार्भ मोठ्याप्रमाणात मिळतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • सॅलड
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. भिजलेले काळे चणे एक वाटी
  2. उकडलेला एक बटाटा
  3. दोन पातीचे कांदे
  4. अर्धी वाटी गाजर चिरलेला
  5. पाव वाटी काकडी चिरलेली
  6. मीठ
  7. दोन चमचे लिंबाचा रस
  8. मीर पूड चिमूटभर
  9. जिरे पूड एक चमचा
  10. तिखट एक चमचा
  11. ओलं नारळ खवलेलं पाव वाटी
  12. काळं मीठ

सूचना

  1. भिजलेले चणे वाफवून घ्या .
  2. बटाटा बारीक कापा .ओले खोबरे किसून घ्या .
  3. गाजर ,काकडी, कांदा बारीक चिरा
  4. सर्व जिन्नस एका वाडग्यात एकत्र मिक्स करा .
  5. त्यामध्ये तिखट ,मीठ ,जिरे पूड ,लिंबाचा रस ,काळं मीठ टाका .
  6. हातानी छान मिक्स करा .....आणि सॅलड सर्व्ह करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर