मुख्यपृष्ठ / पाककृती / विदर्भ स्पेशल रस्सा

Photo of Vidarbha special Rassa by Vaishali Joshi at BetterButter
1592
8
0.0(0)
0

विदर्भ स्पेशल रस्सा

Dec-28-2017
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

विदर्भ स्पेशल रस्सा कृती बद्दल

ह्या रस्सा मध्ये आवडीनुसार कुठल्याही प्रकारचे कोफ्ते कींवा बॉईल एग घालू शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी

साहित्य सर्विंग: 3

  1. १कांदा
  2. ५-६ लाल सुख्या मिरच्या
  3. ८-१० लसुण पक्ळ्य़ा
  4. १ इंच आल्याचा तुकडा
  5. २ चमचे धणे
  6. ४-५ लवंग
  7. ७-८ काळे मिरे
  8. ३ चमचे सुक्या खोब्र्याचा किस
  9. १/२ चमचा जीर
  10. १ चमचा खसखस
  11. १/२ चमचा ज्वारी पीठ
  12. हळद
  13. तिखट
  14. मीठ
  15. कोथिमबिर

सूचना

  1. कांदा जाडसर चिरुन घ्या
  2. लसूण सोलून घ्या
  3. आल सोलून बारीक़ चिरुन ठेवा
  4. ज्वारी पीठ लालसर भाजून थोड्या पाण्यात पातळ पेस्ट बनवून ठेवा
  5. आता गैस सुरु करून कढई तापत ठेवा
  6. लसूण आणि आल सोडून
  7. एक एक करून साहित्य कोरडच भाजायला सुरुवात करा (अजिबात तेल घालायच नाही )
  8. कांदा खोबर पण काळपट भाजा
  9. आता मिक्सर मध्ये कोथिंबिर सोडून सगळ साहित्य (कांदा,,लसूण,आल,खोबर,जीर,मिरे,मिरच्या,धणे खसखस )थोड पाणी घालून अगदी बारीक़ वाटून घ्या
  10. कढईत थोड जास्तच तेल टाका
  11. गरम झाल्यावर बारीक़ केलेला मसाला त्यात घाला
  12. परतत राहा तेल सुटे पर्यंत
  13. मसाला तेलात छान लालसर झाल्याची खात्री करून अगदी थोड पाणी घाला थोड मीठ आणि थोड़ी कोथिमबिर घालून छान परतवून घ्या
  14. ज्वारिच्या पिठाची पेस्ट टाकून मिक्स करा (यानी रस्सा दाट होतो )
  15. आता १-१/२ ग्लास पाणी टाकुन एक उकळी येउ द्या
  16. वरून कोथिमबिर घाला
  17. बाऊल मध्ये रस्सा काढून घ्या
  18. मनपसंद कोफ्ते किंवा बॉईल एग सोबत सर्व करु शकतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर