मुख्यपृष्ठ / पाककृती / GREEN red kachori jara hatke

Photo of GREEN red kachori jara hatke by Chayya Bari at BetterButter
476
9
0.0(2)
0

GREEN red kachori jara hatke

Dec-29-2017
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

GREEN red kachori jara hatke कृती बद्दल

जरा वेगळी कचोरी बनविण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किटी पार्टी
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. सारण साहित्य
 2. गाजराचा किस २वाट्या
 3. मटार दाणे २वाट्या
 4. तिखट १/२चमचा
 5. हिरवी मिरची पेस्ट १/२चमचा
 6. आले लसूणपेस्ट १चमचा
 7. मीठ गरजेनुसार
 8. जिरे पावडर १चमचा
 9. तेल फोडणीसाठी
 10. पारी साठी
 11. मैदा ४वाट्या
 12. चिमूटभर मीठ
 13. तेल मोहन देण्यासाठी व तळण्यासाठी

सूचना

 1. तयारीत मैदा मीठ व तेलाचे मोहन टाकून भिजवून कापड झाकून ठेवावे
 2. गाजर किसून व मटारचे दाणे मिक्सरवर जाडसर फिरवून घ्यावे
 3. आले लसूण पेस्ट, मिरची पेस्ट करावी
 4. तेल तापवून आले लसूण पेस्ट परतून गाजराचा किस टाकावा
 5. मग तिखट व चवीला मीठ १/२चमचा जिरे पावडर घालावी नीट हलवून वाफ घ्यावी
 6. जरा कोरडे व्हायला लागले की गॅस बंद करावा
 7. आता दुसऱ्या कढईत तेल टाकून त्यात जिरे टाकावे
 8. नंतर आले लसूण पेस्ट ,हिरवी मिरची पेस्ट घालावी
 9. मग जिरे पावडर घालावी
 10. मग मटारचे मिश्रण घालून नीट हलवावे
 11. मग वाफ घ्यावी
 12. मिश्रण कोरडे होऊ लागले की काढून घ्यावे
 13. आता मैदा छान रगडून पुरीप्रमाणे गोळे करावे
 14. पुरी लाटून त्यावर किंचित तेल लावावे
 15. मैदा किंचित भुरभुरावा
 16. मग गाजराचे मिश्रण त्यावर दाबून भरावे
 17. ते तेल व मैद्यामुळे चिकटते
 18. मग त्यावर मटारचे मिश्रण पसरावे
 19. मग अंगठ्याने पुरीला आधार देऊन मिश्रण एकत्र होणार नाही अशी कचोरी भरावी
 20. म्हणजे ग्रीन रेड लेअर वेगळे दिसतील
 21. कडक तेल तापवून कचोरी सोडावी
 22. वर आली की पालटवून मंद गॅसवर तळावी
 23. गरमा गरम स्नॅक्स तयार
 24. नुसती खाल्ली तर गाजर मटारचे चव अनुभवता येते

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Dipti Chirde
Dec-29-2017
Dipti Chirde   Dec-29-2017

Superb

Jayshree More
Dec-29-2017
Jayshree More   Dec-29-2017

Mst

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर