पालक सूप | PALAK soup Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  31st Dec 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of PALAK soup by Chayya Bari at BetterButter
पालक सूपby Chayya Bari
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

8

0

5 votes
पालक सूप recipe

पालक सूप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make PALAK soup Recipe in Marathi )

  • पालक हाताच्या मुठीत मावेल इतकी पाने
  • मीठ
  • मटार दाणे ऐच्छिक
  • कॉर्न फ्लोअर १छोटा चमचा
  • मिरपूड चवीप्रमाणे
  • बटर १/२चमचा
  • तमालपत्र १तुकडा
  • आख्खे मिरे २
  • दालचिनी छोटा तुकडा
  • फ्रेश क्रीम फेटलेलं १चमचा
  • जिरे लसूण पेस्ट १/२चमचा

पालक सूप | How to make PALAK soup Recipe in Marathi

  1. प्रथम पालक धुवून ५मिनिटे वाफवून घेतला
  2. गार करून मिक्सरवर प्युरी बनवली
  3. बटर तापवून त्यात दालचिनी मिरे तमालपत्र टाकून काढून घेतले
  4. फक्त स्वाद आला पाहिजे आपण मिरपूड वापारणारच आहोत
  5. मग लसूण जिरे पेस्ट टाकून परतावे
  6. मटार दाणे टाकायचे असतील तर ते टाकून परतावे व ३मिनिटे वाफवावे
  7. मग पालक प्युरी टाकावी
  8. १ते१.५ग्लास पाणी टाकावे
  9. मीठ टाकावे
  10. कॉर्नफ्लॉवर पेस्ट पाण्यात घोळवून टाकावी
  11. ३ते५मिनिटे उकळी घ्यावी
  12. बाऊल मध्ये काढून मिरपूड टाकून ढवळावे
  13. वरून फेटलेलं फ्रेश क्रीम टाकावे
  14. गरमागरम द्यावे

My Tip:

पौष्टीक सूप असून आवडत असल्यास मुलांना देताना १चमचा टोमॅटो प्युरी व साखर टाकली किंचित तरी छान लागते

Reviews for PALAK soup Recipe in Marathi (0)