आलू टिक्की | Aloo tikki Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  3rd Jan 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Aloo tikki by Rohini Rathi at BetterButter
आलू टिक्कीby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

5

0

0 votes
आलू टिक्की recipe

आलू टिक्की बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aloo tikki Recipe in Marathi )

 • उकडलेले बटाटे सात ते आठ
 • कॉर्न फ्लोवर 2 टेबल स्पून
 • चाटमसाला एक टेबल स्पून
 • मीठ चवीनुसार
 • हिरवी मिरची तीन ते चार बारीक चिरलेली
 • ब्रेड क्रम्स अर्धा कप
 • तेल टिक्की भाजण्यासाठी
 • बारीक चिरलेला कांदा
 • बारीक शेव आर्धा कप
 • दही अर्धा कप
 • बारीक चिरलेली कोथंबीर अर्धा कप
 • हिरवी चटणी अर्धा कप
 • चिंचेची चटणी अर्धा कप

आलू टिक्की | How to make Aloo tikki Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडून घ्यावेत
 2. थंड झाल्यानंतर बटाट्याची साले काढून बटाटे कुस्करून घ्यावेत
 3. नंतर कुस्करलेल्या बटाट्यात चाट-मसाला हिरवी मिरची मीठ ब्रेड क्रम्स कॉनफ्लॉवर एकत्र करून टिक्की चे पीठ मळून घ्यावे( पीठ थोडे पातळ असल्यास त्यात थोडासा कॉर्न फ्लोवर किंवा मैदा घालावा)
 4. तयार पिठातून छोटे छोटे गोळे काढून हातावर गोल-गोल टिक्की बनवून घ्यावी
 5. एका नॉनस्टिक पॅनमध्ये तेल टाकून टिक्की दोन्ही बाजूंनी मंद आचेवर लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यावी
 6. तयार टिक्की वर दही चिंचेची चटणी बारीक शेव हिरवी चटणी कांदा कोथिंबीर घालून सर्व्ह करावी

My Tip:

टिक्की भाजण्या ऐवजी तळू शकता

Reviews for Aloo tikki Recipe in Marathi (0)