तिखट दिंडे | TIKHAT dinde Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  5th Jan 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • TIKHAT dinde recipe in Marathi,तिखट दिंडे, Chayya Bari
तिखट दिंडेby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

4 votes
तिखट दिंडे recipe

तिखट दिंडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make TIKHAT dinde Recipe in Marathi )

 • हरबरा डाळ १.५ वाटी
 • खोबऱ्याचा किस १/२वाटी
 • कोथिंबीर थोडी
 • आले लसूण पेस्ट १चमचा
 • जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
 • तिखट, मीठ, हळद चवीप्रमाणे
 • तेल फोडणी ग्रीसिंग व मोहन साठी
 • कणिक २वाट्या
 • बारीक रवा २,३चमचे
 • मीठ पिठात थोडेसे
 • तीळ १चमचा

तिखट दिंडे | How to make TIKHAT dinde Recipe in Marathi

 1. तयारीत कणिक रवा तेलाचे मोहन मीठ व तीळ टाकून घट्ट भिजवून ठेवावा
 2. डाळ धुऊन मिक्सरवर बारीक करावी
 3. आले लसूण पेस्ट करावी
 4. तेल कढईत तापवत ठेवावे
 5. आले लसूण पेस्ट परतावी
 6. तिखट मीठ हळद घालून परतावे
 7. वाटलेली डाळ घालून वाफ घ्यावी
 8. जरा मोकळी झाली की उतरून कोथिंबीर खोबरं किस घालावा
 9. भिजवलेल्या पिठाचे पुरीप्रमाणे गोळे करावे
 10. त्याची पातळ पुरी लाटावी
 11. त्यात डाळीचे सारण भरून हव्या त्या आकारात बंद करावी
 12. चाळणीला तेलाचे ग्रीसिंग करून त्यावर स्टफ केलेली दिंडे ठेवावी
 13. कढईत पाणी त्यावर स्टॅन्ड ठेवून दिंडे १५मिनिटे वाफवून घ्यावे
 14. नंतर काढून गरम गरम सर्व्ह करावी
 15. वाफवाल्यावर शॅलो फ्राय केली तरी चालतात
 16. शॅलो फ्राय न करताही चांगली लागतात
 17. खोबऱ्याचा चटणी बरोबर किंवा नुस्तीही खाता येतात

My Tip:

स्नॅक्स म्हणून हा इंनोव्हेटिव्ह प्रकार आहे तेलकट नसल्याने प्रकृतीला उत्तम

Reviews for TIKHAT dinde Recipe in Marathi (0)