Photo of PINEAPPLE sweet rice by Minal Sardeshpande at BetterButter
622
8
0.0(1)
0

PINEAPPLE sweet rice

Jan-09-2018
Minal Sardeshpande
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी तांदूळ
  2. एक वाटी साखर
  3. चार पाच लवंगा
  4. एक वाटी अननसाच्या फोडी
  5. एक वाटी अननसाचा रस
  6. एक चमचा अननस इसेन्स(ऐच्छिक)
  7. काजूगर
  8. बेदाणे
  9. चार चमचे तूप
  10. खाण्याचा पिवळा रंग
  11. मीठ

सूचना

  1. तांदूळ धुवावेत, चाळणीवर निथळत ठेवावेत.
  2. अननस कापून मधला जाड दांडा आणि साल काढून फोडी कराव्यात.
  3. एक वाटी रस होईल एवढया फोडी ज्युसर जारला फिरवून रस गाळून घ्यावा.
  4. एक वाटी फोडी तशाच ठेवाव्यात.
  5. कढईत तूप तापत ठेवावे.
  6. त्यात लवंगा घालाव्यात.
  7. लवंगा तळल्या की त्यात तांदूळ घालून परतावेत.
  8. तांदूळ परतले की कुकरच्या डब्यात काढून त्यात दुप्पट पाणी घालून आणि चिमुटभर खायचा रंग घालून भात शिजवून घ्यावा.
  9. शिजलेला भात परातीत मोकळा करायला ठेवावा.
  10. कढईत साखर, अननसाचा रस, मीठ घालून साखर विरघळून घ्यावी.
  11. इसेन्स घालावा.
  12. काजूगर बेदाणे घालावे.
  13. आता त्यात तयार भात मिसळावा.
  14. बाजूने तूप सोडून पाच मिनिटं वाफ काढावी.
  15. भात तयार झाला की सर्व्ह करताना अननसाच्या फोडींनी सजवून वाढावा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Jan-09-2018
Chayya Bari   Jan-09-2018

लई भारी!

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर