Photo of Dudhi Ladu by Archana Lokhande at BetterButter
510
7
0.0(0)
0

दुधी लाडू

Jan-09-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी लाडू कृती बद्दल

नेहमीच आपण दुधीचा हलवा बनवतो.काहीतरी वेगळे म्हणून आज मी दुधाचे लाडू केले. यातही वेगळे म्हणून थोडा रवा घातला आहे. माझ्या मुलाला तर खुप आवडला. तुम्हाला कशा वाटतो ते सांगा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दुधी भोपळा
  2. साखर १ वाटी
  3. रवा १ चमचा
  4. साजूक तूप २ चमचे
  5. विलायची पावडर
  6. काजू
  7. बदाम
  8. व्हेनिला इंसेस १ थेंब

सूचना

  1. दुधी भोपळ्याची साल काढून धुवून किसून घेतला.
  2. कढई गरम करून प्रथम रवा भाजून बाजूला काढून ठेवला.
  3. कढईत किसलेला दुधी भोपळा घालून दोन सेकंद तसाच परतला.
  4. नंतर दुधीचे पाणी आटल्यावर तुप घालून दोन ते तीन मिनिटे मध्यम आचेवर परतला.
  5. साखर घालून मिक्स करून पाच मिनिटे एकसारखे हलवावे.
  6. मिश्रण पुर्णपणे कोरडे होईल तोपर्यंत हलवत राहावे.
  7. नंतर विलायची पावडर, रवा, काजू- बदामाचे बारीक काप घालून मिक्स करून घेतले.
  8. व्हेनिला इंसेंस घालून मिक्स करून दोन मिनिटे परतले आणि गँस बंद केला.
  9. मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्याचे लाडू वळून घेतले.
  10. वरून बदामाचे काप घालून दुधी लाडू सर्व्ह केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर