झटपट गाजर हलवा | Instant gajar halva Recipe in Marathi

प्रेषक Savita Sarpotdar Deshpande  |  9th Jan 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Instant gajar halva recipe in Marathi,झटपट गाजर हलवा, Savita Sarpotdar Deshpande
झटपट गाजर हलवाby Savita Sarpotdar Deshpande
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

9 votes
झटपट गाजर हलवा recipe

झटपट गाजर हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Instant gajar halva Recipe in Marathi )

 • 1 किलो गुलाबी गाजरे
 • 200 ग्राम्स साखर
 • 200 ग्राम खवा
 • 4 टेबलस्पून साजुक तूप
 • किसलेले बदाम, काजू,पिस्ते बेदाणे आवडीनुसार
 • 1 टीस्पून वेलदोडा पावडर

झटपट गाजर हलवा | How to make Instant gajar halva Recipe in Marathi

 1. गाजरे स्वच्छ धुवून,साले काढून किसा. त्यात साखर घाला आणि पाणी अजिबात न घालता हे भांडे कुकरला लावून 3 शिट्ट्या करा. कुकर थंड होऊद्या.
 2. एका कढईत तूप घालून सुकामेवा हलका टाळून बाजूला काढा. त्याच तुपात खवा बदामी रंगावर परतून घ्या.
 3. त्यात आता गाजर,साखरेचे मिश्रण घालून पाणी आटेतो परता.
 4. सुकामेवा आणि वेलची पूड घालून वाढा.

Reviews for Instant gajar halva Recipe in Marathi (0)