रवा लाडू | Rava ladu Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  10th Jan 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Rava ladu by Pranali Deshmukh at BetterButter
रवा लाडूby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

8

0

1 vote
रवा लाडू recipe

रवा लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rava ladu Recipe in Marathi )

 • किसमिस , बेदाणे ,
 • 1 चमचा वेलची पावडर
 • एक वाटी खोवलेला नारळ
 • एक वाटी साजूक तूप.
 • एक वाटी दूध
 • दीड वाटी साखर
 • दोन वाटी बारीक रवा

रवा लाडू | How to make Rava ladu Recipe in Marathi

 1. प्रथम एका जाड बुडाच्या कढईत घालून मंद आचेवर रवा भाजायला घ्या. आधी रवा कोरडाच भाजा.
 2. जरा भाजला गेल्याचा वास यायला लागला की त्यात तूप घाला. नीट हलवून घ्या आणि मंद आचेवर मधूनमधून हलवत चांगलं भाजा. रवा चांगला भाजला गेला पाहिजे पण फार लाल करायचा नाहीये.
 3. रवा भाजून होत आला की एका भांड्यात दूध आणि साखर घालून मंद आचेवर हलवत पाक करायला ठेवा. साखर विरघळली की दूध फाटेल. दूध असल्यामुळे हा पाक फाटतोच.
 4. दुसरीकडे भाजत आलेल्या रव्यात, खोवलेला नारळ, बेदाणे, चारोळी घाला नीट हलवून जरासं भाजा.
 5. गॅस बंद करून वर वेलची पावडर घाला.
 6. दुधाचा पाक लवकर होतो. आपल्याला एकतारी पाक करायचा आहे. पाक झाला आहे की नाही ते बघण्यासाठी एका वाटीत थोडंसं पाणी घेऊन पाकाचा थेंब टाकून बघा. तो थेंब पाण्यात जरासा जमला की पाक तयार आहे असं समजा.
 7. गॅस बंद करा. आता हा पाक कढईतल्या भाजलेल्या रव्यात घाला. नीट एकजीव मिसळून घ्या आणि हे मिश्रण थंड करायला ठेवा.
 8. मिश्रण मधूनमधून हलवत रहा. मिश्रण लाडू वळण्याइतकं घट्ट होण्यासाठी साधारणपणे अडीच ते ३ तास लागतात.
 9. नंतर या मिश्रणाचे लाडू वळा. हे लाडू वळायला अतिशय सोपे आहेत.
 10. लाडू तयार

Reviews for Rava ladu Recipe in Marathi (0)