मुख्यपृष्ठ / पाककृती / एगलेस रेड वेलवेट कपकेक

Photo of Eggless Red Velvet Cupcakes. by Dr.Shubhangi Kumbhar at BetterButter
827
8
0.0(0)
0

एगलेस रेड वेलवेट कपकेक

Jan-15-2018
Dr.Shubhangi Kumbhar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

एगलेस रेड वेलवेट कपकेक कृती बद्दल

रेड वेलवेट कपकेक दिसायला जितके छान आसतात, तीतकेच ते चविष्ट असतात. हे कपकेक्स मुख्यतः क्रिसमस, व्हेलेनटाइन डे तसेच बर्थडे पार्टी साजरा करण्यासाठी बनवला जातो.

रेसपी टैग

  • व्हॅलेंटाईन दे
  • व्हेज
  • मध्यम
  • व्हिस्कीन्ग
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. मैदा १ कप
  2. दुध १/२ कप
  3. व्हिनेगर १ चमचा लहान
  4. साखर १/२ कप
  5. मीठ १ चिमुटभर
  6. बेकिंग सोडा १ चमचा लहान
  7. बेकिंग पावडर १ चमचा लहान
  8. तेल १/२ कप
  9. व्हेनिला इसेन्स १ चमचा लहान
  10. रेड फुड कलर १/२ चमचा लहान

सूचना

  1. ओव्हन ३७५ F ला प्रीहीट करा
  2. एका भांड्यात दुध आणि व्हिनेगर मिक्स करून ५ मिनिटे बाजूला ठेवा.
  3. आता दुसऱ्या भांड्यात मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ आणि कोको पावडर चाळुन मिक्स करून घ्या.
  4. आता दुसऱ्या भांड्यात साखर, व्हेनिला, रेड फूड कलर आणि तेल घालून चांगले मिक्स (व्हिस्क) करून घ्यावे.
  5. आता तीनही भांड्यातील सर्व साहित्य एकत्र करून, छान मिक्स करून घ्यावे, हे बॅटर इडली बॅटर सारखे होईपर्यंत मिक्स करावे.
  6. आणि हे तयार झालेले मिश्रण कप केक च्या साच्यांमध्ये घालून ३७५ f ला १० ते १२ मिनिटे बेक करावे.
  7. १० मिनिटांनंतर केसमध्ये टुथपिक घालून केक तयार झाला आहे की नाही हे चेक करावे, टुथपिकला जर केक चिकटला नाही तर समजून घ्यावे की कपकेक्स तयार झाले.
  8. कपकेक्स साच्यातुन काढुन रॅकवर ४ ते ५ मिनिट थंड होऊ द्यावे आणि नंतर क्रिम फ्रोस्टिंग ने सजावट करुन खाण्यासाठी द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर