मुख्यपृष्ठ / पाककृती / खजूर अक्रोटाची खीर

Photo of Khajur Akrotchi Kheer by Aarti Nijapkar at BetterButter
740
3
0.0(0)
0

खजूर अक्रोटाची खीर

Jan-15-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजूर अक्रोटाची खीर कृती बद्दल

खजूर आणि अक्रोट हे दोन्ही आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे घटक आहे तर ही खीर करुन नक्की बघा. पौष्टिक आणि स्वादिष्ट आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. दूध १ लिटर
  2. खजूर बी नसलेले ३०० ग्रॅम
  3. अक्रोट कापलेले १०० ग्रॅम
  4. मध ३ मोठे चमचे
  5. भाजलेले ओट्स २ मोठे चमचे
  6. भाजलेले बदाम २ मोठे चमचे
  7. फ्रेश क्रिम १ कप
  8. पाणी १ कप

सूचना

  1. प्रथम खजूर आणि पाणी एकत्र करुन मध्यम आचेवर शिजवून घ्या. खजूर मऊसर होईपर्यंत शिजवा. मग आच बंद करुन गार करुन खजूराची पेस्ट बनवून घ्या
  2. दूध तापवून घ्या मंद आचेवर मग तयार खजूराची पेस्ट घाला व मिश्रण एकजीव करा
  3. एक लहानशी उकळी आली कि अक्रोट व भाजलेले ओट्स घालावे व मिश्रण ढवळत रहा दूध वर येणार नाही १ ते २ मि.
  4. आता फ्रेश क्रिम घाला व पुन्हा मिश्रण एकजीव करुन १ मि. ढवळत रहा उकळी आली कि आच बंद करा
  5. मग त्यात बदामाचे काप व मध घालून मिश्रण एकजीव करुन घ्या
  6. एका भांड्यात काढून छान सजवून घ्या
  7. गरमागरम किंवा थंड करुन कसेही खा दोन्हीही चव उत्तम लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर