Photo of Dates Laddu by Anuradha Kuvalekar at BetterButter
686
3
0.0(0)
0

खजूर लाडू

Jan-17-2018
Anuradha Kuvalekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजूर लाडू कृती बद्दल

खजूर खाण्याचे बरेच फायदे आहेत. थंडीच्या दिवसात खजूर अवश्य खावा. खजूरामध्ये लोह, विटामिन्स व मिनरल्स आहेत. खजूर शक्तीवर्धक व रक्तवाढीसाठी सुध्दा उपयुक्त आहे असे माझ्या वाचनात आले आहे. आपण गोड चटणी करतांना खजूर वापरतो. उपासाच्या दिवशी माझी आई आम्हाला खजूर साजूक तूपात तळून देत असे तर कधी त्यातील बिया काढून त्यात बदाम भरून देत असे. खजूराचे लाडू मला खूप आवडतात. खजूर लाडूची रेसिपी देत आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • नॉर्थ इंडियन
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ३ वाट्या खजूर (बिया काढलेला)
  2. १ वाटी भाजलेले शेंगदाणे
  3. ५-६ काजूचे तुकडे
  4. ५-६ अक्रोडचे तुकडे
  5. ५-६ बदामाचे काप

सूचना

  1. प्रथम मिक्सरमध्ये थोडा बिया काढलेला खजूर व भाजलेले शेंगदाणे एकत्र करून बारीक करा. पुन्हा उरलेला खजूर व शेंगदाणे बारीक करून मिश्रण सारखे करून घ्या.
  2. वरील मिश्रणात काजूचे तुकडे, अक्रोडचे तुकडे व बदामाचे काप घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
  3. तयार मिश्रणाचे मध्यम आकाराचे लाडू वळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर