मुख्यपृष्ठ / पाककृती / Rice noodles in sweet coconut milk

Photo of Rice noodles in sweet coconut milk by Nayana Palav at BetterButter
3
17
0.0(0)
0

Rice noodles in sweet coconut milk

Jan-19-2018
Nayana Palav
5 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • कठीण
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • स्टीमिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

 1. 2 वाटया तांदळाचे पीठ
 2. २ वाटया पाणी
 3. १ टीस्पून मीठ
 4. १ लिटर पाणी तांदळाचे उंडे उकडण्यासाठी
 5. २ ग्लास नारळाचे घट्ट दूध किंवा २ टेट्रा पॆक नारळाचे दूध
 6. १/४ टीस्पून वेलची पूड
 7. १ छोटी वाटी किसलेला गूळ किंवा गूळाची पावडर
 8. काजू आवडीप्रमाणे
 9. १ टीस्पून तूप

सूचना

 1. प्रथम दोन वाटया पाणी उकळत ठेवा.
 2. त्यात मीठ घाला.
 3. पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाचे पीठ घालून ढवळा.
 4. गॅस बंद करा.
 5. दहा मिनिटे पीठ झाकून ठेवा.
 6. आता हे पीठ नीट मळून घ्या.
 7. पीठाचे लंबगोल आकाराचे गोळे (उंडे) करा.
 8. १ लिटर पाणी उकळत ठेवा.
 9. या पाण्याला उकळी आली की हे उंडे पाण्यात घाला १० मिनिटे शिजू दया.
 10. आता हे उंडे बाहेर काढा.
 11. चकली च्या साच्यात शेवयाची चकती घाला.
 12. साच्याला आतून तेल लावा.
 13. साच्यात १ उंडा घालून, शेवया पाडा.
 14. आता एका भांडयात एक कप पाणी घ्या.
 15. भांडे गॅसवर ठेवा, त्यात गूळ घाला.
 16. गूळ वितळला की त्यात वेलची पूड घाला.
 17. आता नारळाचे दूध घाला.
 18. हे गोड दूध बाजूला ठेवा.
 19. आता तूपावर काजू परतून घ्या.
 20. हे काजू दूधात घाला.
 21. आता एका वाडग्यात नारळाचे दूध घ्या, त्यात तांदळाच्या शेवया घाला.
 22. तयार आहेत स्वादिष्ट शिरवळया.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Aug-18-2018
tejswini dhopte   Aug-18-2018

Wow

Poonam Nikam
Jan-23-2018
Poonam Nikam   Jan-23-2018

mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर