मुख्यपृष्ठ / पाककृती / कराची हलवा

Photo of Karachi Halwa by Archana Lokhande at BetterButter
773
5
0.0(0)
0

कराची हलवा

Jan-19-2018
Archana Lokhande
10 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कराची हलवा कृती बद्दल

कराची हलवा हा कराची, सिंध, मध्ये होळी पार्टीसाठी खासकरून बनवला जातो. त्यामुळे ही होळी स्पेशल डिश आहे.

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • होळी
  • व्हेज
  • मध्यम
  • सिंधी
  • सौटेइंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. १०० ग्रँम काँर्नफ्लोर
  2. १०० ग्रँम तुप
  3. ३०० ग्रँम साखर
  4. पाणी
  5. मगज बी
  6. सायट्रिक एँसिड(लिंबू सत्व)
  7. बदामाचे काप
  8. रंग आवडीप्रमाणे

सूचना

  1. प्रथम कढईत मगच बी भाजून बाजूला काढून ठेवली.
  2. त्याच कढईत साखर घालून ती बुडेल इतके पाणी घालून साखर विरघळेपर्यंत २-३ मिनिटे मध्यम आचेवर उकळवत ठेवले.
  3. साखर विरघळेपयँत काँर्नफ्लोरमध्ये पाणी घालून त्याची पातळ दुधाप्रमाणे पेस्ट करून घेतली.
  4. उकळी आल्यावर त्यात तयार पेस्ट घालून मध्यम आचेवर मिक्स करून घेतले.
  5. ५-७ मिनिटे हलवत राहावे. नाहीतर लगेच खाली लागते.आणि नंतर पेस्ट घट्ट होऊ लागल्यावर १०० गँम तुप थोडे थोडे करून घालत राहिले.
  6. नंतर आवडीचा रंग घालून मिक्स करून घेतले.घातलेले तुप आटल्यास पुन्हा थोडे तुप १० मिनिटे हलवत राहिले.
  7. नंतर थोडे बदामाचे काप आणि मगज बी घालून मिक्स करून घेतले. पुन्हा थोडे थोडे तुप घालत १० मिनिटे मध्यम आचेवर हालवत राहिले असे १०० ग्रँम घालून अटेपँयत करत राहावे.
  8. जेलीप्रमाणे चमक येते म्हणजेच ट्रान्सफर दिसते आणि तुप सोडू लागते तेव्हा गँस बंद करून २ मिनिटे तसेच हालवत राहिले.
  9. नंतर एका डिशमध्ये काढून घेतले. हे सेट होण्यास २ तास लागतात.
  10. कराची हलवा २ तासांनी सेट झाल्यावर वरून बदामाचे काप घातले.
  11. आणि वड्या पाडून तयार झाला कराची हलवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर