Photo of Til gulachi poli by Madhuri Deshmukh at BetterButter
1049
10
0.0(4)
0

Til gulachi poli

Jan-20-2018
Madhuri Deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Til gulachi poli कृती बद्दल

आगळी वेगळी अशी तीळ गूळ पोळी

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गूळ पिवळा 4 वाट्या
  2. भाजलेल्या तिलाच कूट 1 वाटी
  3. भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट १/२ वाटी
  4. बेसन पीठ १ वाटी
  5. सुक्या खोबऱ्याचा किस १ वाटी
  6. खसखस १ चमचा
  7. वेलची पूड १ चमचा
  8. जायफळ पूड १ चमचा
  9. आवरणाकरिता
  10. कणिक ४ वाट्या
  11. मैदा १ वाटी
  12. बेसन २ चमचे
  13. तेल ४चमचे

सूचना

  1. १ कढईमध्ये२ चमचे तेलावर १ वाटी बेसन सोनेरी रंगावर भाजून घ्या
  2. २ सुके खोबरे सोनेरी रंगावर भाजून घ्या,व ते मिक्सर मधून बारीक करून घ्या
  3. ३गूळ किसणीने किसून घ्या
  4. ४ खसखस भाजून त्याची पूड करून घ्या
  5. ५ भाजलेले बेसन ,तिळाचा कूट ,दाण्याचा कूट,भाजलेले सुके खोबरे, किसलेला गुळ वेलची पूड जायफळ पूड,खसखस पूड सर्व एकत्र मिसळून घ्या,आता हे सारण तयार झाले.
  6. ६ कणिक,मैदा व बेसन पीठ एकत्र करून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकावे,४ चमचे तेल गरम करून पिठात मिसळावे व पाणी घालून कणिक घट्ट भिजवून घ्यावी.१५मिनिट कणिक भिजू द्यावी.पोळी करताना लिंबा एवढी कणिक घेऊन त्याचा गोळा बनवून त्याची वाटी करून घ्यावी ,व त्यामध्ये तयार सारणाचा लिंबा एवढा गोळा भरून तोंड बंद करून घ्यावे व पिठी लावून पोळी लाटून घ्यावी ,ग्यासवर तवा तापला कि पोळी तव्यावर टाकावी व मंद आचेवर भाजून घ्यावी.
  7. 7पोळीवर तूप टाकून खायला द्यावी.

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chandrakant Pathak
Jan-20-2018
Chandrakant Pathak   Jan-20-2018

खमंग आणि खुसखुशित!!!

Pratik Pathak
Jan-20-2018
Pratik Pathak   Jan-20-2018

Very nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर