मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळगुळाचे लाडू

Photo of Sesame laddus by Divya Jain at BetterButter
1041
4
0.0(0)
0

तिळगुळाचे लाडू

Jan-21-2018
Divya Jain
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळगुळाचे लाडू कृती बद्दल

Til Laddu are Very Healthy. They are Rich Source Of Essential Fatty Acids And Proteins. => तिल Laddu अतिशय निरोगी आहेत. ते सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् आणि प्रथिने.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. १/२ किलो तिळ
  2. १/२ किलो चिकीचा गूळ
  3. १ ते दिड वाटी शेंगदाण्याचा भरडसर कूट
  4. १ वाटी किसून भाजलेले सुके खोबरे
  5. १/२ वाटी चण्याचं डाळं
  6. १ चमचा वेलची पूड
  7. १ ते २ चमचे तूप

सूचना

  1.  १/२ किलो तिळ व्यवस्थित भाजून घ्यावेत. 
  2. पातेल्यात चिकीचा गूळ घ्यावा. थोडे तूप घालावे. गूळाचा गोळीबंद पाक करावा. सतत ढवळत राहावे, गूळ पूर्ण पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो.
  3. पाक गोळीबंद झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गूळाचा पाक फेसाळला कि गॅस बारीक करावा. एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा. बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा "टण्णं" असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे.
  4.  पाक गोळीबंद झाला कि त्यात भाजलेले तिळ, दाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, चण्याचे डाळं, वेलची पूड घालून निट ढवळावे, आणि गरम असतानाच लाडू वळावेत. 
  5. लाडू वळताना हाताला थोडे तूप लावावे ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर