439
4
0.0(0)
0

गुलाबजाम

Jan-22-2018
Manisha /(Radhika wagh)
10 मिनिटे
तयारीची वेळ
75 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलाबजाम कृती बद्दल

हा गोड पदार्थ आहे हा सगळ्या समारंभात, सणाला करतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 10

  1. १/२ किलो खवा।
  2. ४५० ग्रॅम साखर
  3. १२५ ग्रॅम मैदा
  4. पाव किलो तूप किंवा तेल
  5. थोडी वेलदोडा पुड

सूचना

  1. एका थाळीत १ /२ किलो खवा घ्या
  2. त्या खव्यात१२५ ग्रॅम मैदा घालून चांगले मिक्स करुन मळून घ्या।
  3. एका मोठ्या भांड्यात ४५० ग्रॅम साखर घाला
  4. आणि त्यात साखर बुडेल इतके पाणी घालून
  5. गॅसवर ठेवून १ तारी पाक तयार करून ठेवा।
  6. पाकात थोडी वेलदोडा पुड घालून हलवणे
  7. नंतर मिक्स करुन मळून घेतलेल्या खव्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या
  8. कढईत पाव किलो तूप किंवा तेल घालून
  9. खव्याचे छोटे छोटे गोळे तळून लगेच पाकात टाका।
  10. पाकात साधारण १ तास गुलाबजाम मुरु द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर