Photo of Vada Pav by Afroz Shaikh at BetterButter
6408
343
4.6(0)
1

वडा पाव

Feb-15-2016
Afroz Shaikh
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वडा पाव कृती बद्दल

शब्दशः 'मुंबईचा प्राण', दिवसभरात कोणत्याही वेळी खाल्ला जाऊ शकणारा पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 उकडलेले बटाटे
  2. तळण्यासाठी तेल
  3. मीठ स्वादानुसार (मिश्रणासाठी)
  4. हळद (मिश्रणासाठी) 1/4 लहान चमचा
  5. चण्याचे पीठ/बेसन (मिश्रणासाठी)1 वाटी
  6. मीठ स्वादानुसार
  7. कोथिंबीर चिरलेली 2 लहान चमचे
  8. तेल 1 मोठा चमचा
  9. हळद अर्धा लहान चमचा
  10. मोहरी 1 लहान चमचा
  11. कडीपत्त्याची पाने 6-7
  12. हिरव्या मिरच्या 3
  13. आले ठेचलेले अर्धा इंच
  14. लसणाच्या कळ्या ठेचलेल्या 5
  15. 4 पाव
  16. चटणीसाठी:
  17. तीळ 3 मोठे चमचे
  18. सुक्या खोबऱ्याचा कीस 3 मोठे चमचे
  19. शेंगदाणे 2 मोठे चमचे
  20. लसणाच्या कळ्या 12-14
  21. 1 लहान चमचा लाल तिखट
  22. स्वादानुसार मीठ

सूचना

  1. एका भांड्यात बेसन, हळद आणि मीठ घ्या. त्यात गरजेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करा आणि बाजूला ठेवा. एका दुसऱ्या भांड्यात उकडलेले बटाटे कुस्करून घ्या.
  2. एका कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडायला लागली की त्यात कडीपत्ता, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ठेचलेले आले आणि लसूण घालून 2 मिनिटे मंद विस्तवावर परता.
  3. नंतर विस्तावावरून उतरवून त्यात हळद घाला. ही फोडणी, चिरलेली कोथिंबीर आणि मीठ कुस्करलेल्या बटाट्यात मिसळा.
  4. बटाट्याच्या मिश्रणाचे सहा भाग करा आणि त्याचे गोळे तयार करा. वडे तळण्यासाठी एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर बटाट्याचे गोळे बेसनाच्या मिश्रणात बुडवून बदामी रंगाचे होईपर्यंत तळा.
  5. हे वडे पाव आणि लसणाच्या चटणीबरोबर वाढा.
  6. लसणाची चटणी बनविण्यासाठी: एका गरम तव्यावर तीळ, खोबऱ्याचा कीस, शेंगदाणे वेगवेगळे भाजा आणि थंड होऊ द्या. त्याच तव्यावर एक लहान चमचा तेल गरम करा आणि ठेचलेला लसूण घाला. रंग बदलेपर्यंत परता. नंतर विस्तव बंद करा.
  7. जेव्हा सर्व सामग्री थंड झाली की मिक्सरमध्ये घालून, लाल तिखट आणि मीठ घालून फिरवा. त्याला हवाबंद डब्यात ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर